पंचवीस दिवसांत भरले राधानगरी धरण

By Admin | Updated: August 3, 2014 01:46 IST2014-08-03T01:39:27+5:302014-08-03T01:46:44+5:30

६.६४ टीएमसी पाणीसाठा

Radhanagari dam filled in twenty-five days | पंचवीस दिवसांत भरले राधानगरी धरण

पंचवीस दिवसांत भरले राधानगरी धरण

राधानगरी : मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या पाणलोट क्षेत्रामुळे केवळ पंचवीस दिवसांत झालेल्या पावसामुळे राधानगरी धरणात ६.६४ टीएमसी पाणीसाठा झाला. या काळात धरणात ५५.७० फूट पाणीपातळी वाढली. याशिवाय वीजनिर्मितीसाठीही पाणी सोडण्यात आले. काल, शुक्रवारी हे धरण पूर्ण भरले. यामुळे यावर अवलंबून असलेल्या गावांची पाण्याची गरज वर्षभर भागणार आहे.
यावर्षी केवळ आठ-दहा दिवस किरकोळ हजेरी लावून जून महिन्यात मान्सून कोरडाच गेला. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे भरण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. राधानगरी धरणातील पाण्याचा वापर कोल्हापूर शहरासह इचलकरंजीपर्यंत बहुतांश शेती व पिण्यासाठी होतो.
यावर्षी ८ जुलैपर्यंत येथे केवळ ४६८ मिलिमीटर पाऊस झाला होता. यावेळी धरणाची पाणीपातळी २९१.८० फूट व साठा १.९० टीएमसी होता. त्यामुळे या दिवसापासून जलविद्युत निर्मितीसाठी सोडण्यात येणारे पाणीही बंद केले होते. ८ जुलै ते १ आॅगस्टपर्यंत येथे २३७२ मिलिमीटर पाऊस झाला. राधानगरी अभयारण्याचे बहुतांश क्षेत्र या पाणलोट क्षेत्रात येते. दाजीपूर परिसरात इथल्यापेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यामुळे धरणात येणारे पाणी संचय क्षमतेच्या तिप्पट असते. मागील दहा-बारा दिवसांपासून जलविद्युत निर्मितीही सुरू होती.
काल सायंकाळी धरणाची पाणीपातळी ३४७.५० फूट झाल्यावर दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. आतापर्यंतच्या साठ वर्षांच्या कालखंडात धरण जुलैअखेर पूर्वीच भरले आहे. गतवर्षी २३ जुलै रोजी धरण भरले होते. यावर्षी पाऊस लांबूनही धरण भरायला नऊ दिवस जास्त लागले.

Web Title: Radhanagari dam filled in twenty-five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.