लेकीप्रमाणे केले राधागाईचे डोहाळे जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:27 IST2021-08-19T04:27:18+5:302021-08-19T04:27:18+5:30

सरदार पाटील यांची पाडळी खुर्द येथे शेती आहे. स्वतःच्या मुलांप्रमाणे, जिव्हाळ्याने पशुधनाचा ते सांभाळ करतात. राधा गायही आपल्या मुलीसारखीच ...

Radhagai's Dohale meal made like Leki | लेकीप्रमाणे केले राधागाईचे डोहाळे जेवण

लेकीप्रमाणे केले राधागाईचे डोहाळे जेवण

सरदार पाटील यांची पाडळी खुर्द येथे शेती आहे. स्वतःच्या मुलांप्रमाणे, जिव्हाळ्याने पशुधनाचा ते सांभाळ करतात. राधा गायही आपल्या मुलीसारखीच आहे, असे सांगत पाटील दाम्पत्याने मायेपोटी चक्क राधा गाईचे डोहाळे पुरविले आणि तिला गोड जेवण दिले. गाईच्या डोहाळे जेवणाचा हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला.

सोहळ्यासाठी श्रीपती पाटील, सागर पाटील, सानिका पाटील, उज्ज्वला साळोखे, मेघा पाटील, मंगल पाटील, भारती पाटील, पूजा पाटील, अरूंधती पाटील, मीनाक्षी पाटील, सीता पाटील, केराबाई पाटील, वृषाली साळोखे, इंदूताई पाटील, वंदना पाटील, रेखा पाटील व महिला उपस्थित होत्या.

फोटो : पाडळी खुर्द (ता. करवीर) राधागाईचा डोहाळे जेवणाचा सोहळा साजरा करताना पाटील कुटुंबीय.

Web Title: Radhagai's Dohale meal made like Leki