आर. के. नगर रस्त्यावर कचराच कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:43+5:302021-01-08T05:16:43+5:30

ज्योती पाटील पाचगाव : एकीकडे स्वच्छतेसाठी सरकारकडूनच विविध उप्रकमांद्वारे जनजागृती केली जात असली तरी सरकारच्या या प्रयत्नालाच कसा ...

R. K. Garbage on the city streets | आर. के. नगर रस्त्यावर कचराच कचरा

आर. के. नगर रस्त्यावर कचराच कचरा

ज्योती पाटील

पाचगाव : एकीकडे स्वच्छतेसाठी सरकारकडूनच विविध उप्रकमांद्वारे जनजागृती केली जात असली तरी सरकारच्या या प्रयत्नालाच कसा हरताळ फासला जातोय याचा प्रत्यय आर. के. नगर रस्त्यावर येत आहे. या परिसरातील कचरा वेळेत उठाव केला जात नाही. शिवाय, या रस्त्यावरून जाणारे-येणारे नागरिकच रस्त्यावरच कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दोन्ही बाजूस कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचले आहेत. त्यामुळे हा रस्ता आहे की कचराकोंडाळा असा प्रश्न पडत आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावरील कचऱ्याला लागलेल्या आगीचा भडका थेट शेंडा पार्कच्या माळावर वनराईला बसला होता. परिणामी त्यात हजारो झाडे भस्मसात झाली होती. त्यामुळे नागरिकांनी आता तरी सजगता दाखवण्याची गरज आहे. प्रशासनानेही हा कचरा तत्काळ उचलावा अशी मागणी होत आहे. कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या आर. के. नगर भागात दिवसागणिक गोळा होणारा कचरा वेळेत उठाव न केल्याने तो रस्त्यावर इतरत्र पसरला जातो. अनेक नागरिक कचरा मुख्य रस्त्यावर व मुख्य चौकातच टाकतात. त्यामुळे रस्त्यावर दुर्गंधी पसरते. ही दुर्गंधी नागरिकांच्या आरोग्यासाठीही धोकादायक आहे. गेल्या आठवड्यात याच ठिकाणी कचऱ्याला आग लागल्याने वाऱ्याने त्यातील ठिणगी शेंडा पार्क येथील वनराईला लागली. ही आग वाऱ्यासारखी पसरल्याने यामध्ये अनेक झाडे जळून भस्मसात झाली.

चौकट

कचरा कोणी उचलायचा

आर. के. नगर नाक्यावर भाजी मंडई व अनेक हातगाड्या आहेत. येथे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचऱ्याची समस्या आहे. या रस्त्याचा काही भाग महापालिकेच्या हद्दीत तर काही भाग मोरेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. त्यामुळे या रस्त्यावरील कचरा कोणी उचलायचा असाही मुद्दा यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

कोट :

नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता ग्रामपंचायत कर्मचारी ज्यावेळी घंटागाडी घेऊन येतात त्यावेळी कचरा देऊन सहकार्य करावे. आर. के. नगर रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्यासंदर्भात लवकरच उपाययोजना करू. याठिकाणी नागरिक कचरा टाकणार नाहीत अशी व्यवस्था करू

- दत्तात्रय भिलुगडे,प्रभारी सरपंच, मोरेवाडी.

आर. के. नगर येथील पेट्रोल पंपाशेजारी रस्त्यावरच कचऱ्याचे मोठे ढीग साचल्याने वाहनधारकांना व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. याकडे संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावावा व कचरा उठाव करावा.

संग्राम पोवाळकर,माजी उपसरपंच ग्रामपंचायत पाचगाव

फोटो ०५ आरकेनगर कचरा

ओळ

आर. के. नगर मुख्य रस्त्यावर पेट्रोलपंपाशेजारी रस्त्याच्या कडेलाच अस्ताव्यस्त पडलेला कचरा दिसत आहे.

Web Title: R. K. Garbage on the city streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.