आर. गणेशनबॅँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक

By Admin | Updated: May 11, 2014 00:25 IST2014-05-11T00:25:41+5:302014-05-11T00:25:41+5:30

कोल्हापूर : बॅँक आॅफ इंडियाच्या कोल्हापूर विभागाच्या विभागीय व्यवस्थापकपदी आर. गणेशन यांची नियुक्ती झाली आहे. ते सोमवारी (दि.१२)

R. Department Manager of Ganeshbank of India | आर. गणेशनबॅँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक

आर. गणेशनबॅँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक

 कोल्हापूर : बॅँक आॅफ इंडियाच्या कोल्हापूर विभागाच्या विभागीय व्यवस्थापकपदी आर. गणेशन यांची नियुक्ती झाली आहे. ते सोमवारी (दि.१२) पदभार स्वीकारणार आहेत. गणेशन हे उपसरव्यवस्थापकपदी कार्यरत असून, ते मूळचे तिरुचिरापल्ली (तमिळनाडू) येथील आहेत. ३६ वर्षांच्या बॅँकिंग कारकिर्दीमध्ये त्यांनी महाराष्टÑात सांगली, प्रधान कार्यालय मुंबई, दिल्ली येथील शाखा त्याचबरोबर जपानची राजधानी टोकिओ या ठिकाणी विविध पदांवर काम केले आहे. तसेच त्यांनी बॅँकेच्या नवी दिल्ली येथील एसएमई शाखेचे प्रमुखपद भूषविले आहे. आपल्या बॅँकिंग कारकिर्दीचा २४ वर्षांहून अधिक काळ त्यांनी बॅँकेच्या ट्रेझरी व फॉरेन एक्स्चेंज या अत्यंत महत्त्वाच्या विभागातील विविध पदांवर काम केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: R. Department Manager of Ganeshbank of India