आर. डी. आतकिरे यांना शोकसभेद्वारे आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:36+5:302021-07-04T04:17:36+5:30
कोल्हापूर : प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे विद्यमान खजानीस व महाराष्ट्र हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आर. डी तथा राजाराम ज्ञानदेव ...

आर. डी. आतकिरे यांना शोकसभेद्वारे आदरांजली
कोल्हापूर : प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे विद्यमान खजानीस व महाराष्ट्र हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आर. डी तथा राजाराम ज्ञानदेव आतकिरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी अध्यक्ष बी. जी. बोराडे होते.
संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील, उपाध्यक्ष डी. जी. किल्लेदार, सदस्य वैभव नायकवडी, सविता पाटील, आर. डी. पाटील, सेवक उदय पाटील, प्रा. सी. एम. गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त करीत त्यांच्या कार्याचा गौरव केला. या वेळी कार्यकारिणी सदस्य व्ही. एस. मोरे, वाय. एस. चव्हाण, पी. सी. पाटील, प्राचार्य सी. आर. गोडसे, माजी महापौर सई खराडे, एस. ए. निगडे, आदी मान्यवर उपस्थित होते. सचिव रणजित शिंदे यांनी दुखवटा ठरावाचे वाचन केले.