ग्रामपंचायतींच्या थकीत करवसुलीचा प्रश्न मार्गी

By Admin | Updated: November 18, 2015 00:10 IST2015-11-17T21:00:00+5:302015-11-18T00:10:37+5:30

ग्रामगाडा येणार रूळावर : थकबाकी वसुलीतून कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते अदा करण्याचे आदेश

The question of tax evasion of Gram Panchayats will be addressed | ग्रामपंचायतींच्या थकीत करवसुलीचा प्रश्न मार्गी

ग्रामपंचायतींच्या थकीत करवसुलीचा प्रश्न मार्गी

दत्ता बिडकर -- हातकणंगले जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या थकीत करवसुलीचा प्रश्न मार्गी लागला आहे. उच्च न्यायालय आणि शासन आदेशाने एप्रिल २0१५ मध्ये ग्रामपंचायतींच्या करवसुलीला स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती सन२0१५-२0१६ च्या करवसुली करिता होतीे. मागील थकबाकी वसुलीसाठी कोणतीही स्थगिती नव्हती, तरीही ग्रामपंचायतींनी मार्च २0१५ पूवीॅची थकबाकी वसूल करण्यासाठी उपायुक्त ( विकास ) विभागीय आयुक्त पूणे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) यांनी ५ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार ही करवसुली होणार असून थकबाकी वसुली करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करण्याचे आदेश देण्यात आल्यामूळे ग्रामपंचायतींच्या करवसुली मूळे गेले आठ महिने ठप्प झालेला ग्राम गाडा रूळावर येणार आहे.कोल्हापूर जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या करवसुली उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार आणि शासन परिपञक ६/४/२0१५ नूसार जिल्हयातील ग्रामपंचायती च्या करवसुली ला स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती नेमकी कोणत्या वर्षासाठी याबाबत ग्रामपंचायती मध्ये संभ्रम निर्माण होता. यामूळे ग्रामपंचायतींनी आपली संपूर्ण करवसुली थांबवली होती. एप्रिल ते नोव्हेंबर जवळ जवळ आठ महिने ग्रामपंचायतींचे काम ठप्प झाले होते. ग्रामपंचायतींचा दैनंदिन खर्च आणि कर्मचारी पगार ठप्प झाले होते. अनेक गावातील जनसुविधा सह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. करवसुली ठप्प झाल्यामूळे ग्रामपंचायतींचा गावगाडा चालू ठेवणे गाव कारभा-यांना मुस्कील झाले होते.
ग्रामपंचायतींच्या थकीत करवसुली बाबत ४ नोव्हेंबर रोजी उपायुक्त विकास विभागीय आयुक्त पूणे यांच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत उच्च न्यायालय मुंबई यांचा स्थगिती आदेश आणि शासनाचे दि ६/४/२0१५ रोजीचे परिपत्रक यावर या बैठकीत चर्चा झाली आणि उच्च न्यायालय व शासनाने २0१५/२0१६ च्या करवसुली ला स्थगिती दिली आहे. ३१/३/२0१५ पूर्वीची थकबाकी वसूल करण्यासाठी कोणतीही स्थगिती दिली नसल्याने मागील थकबाकी वसूल करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. ग्रामपंचायती नी मार्च २0१५ च्या मागील करवसुली थकीत आहे ती तात्काळ सुरू करण्या चा आदेश देण्यात आला. या बैठकीतील निर्णयानूसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) एम. एस. घुले यांनी ग्रामपंचायतींना जा. क्र./ कोजिप/ पंचायत/ कावि-१६/करवसुली दि- ५/११/२0१५ च्या पञाने स्वतंत्र आदेश काढून ३१/३/२0१५ च्या मागील सन १४/१५ सह संपूर्ण थकबाकी वसूल करावी असा आदेश दिला आहे.

ग्रामस्थांना जनसुविधा
पूणे आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या आदेशा मूळे ग्रामपंचायती ना थकीत करवसुली करण्याचा मागॅ सूकर झाला आहे. थकित करवसुली करून ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याचे आदेश देण्यात आल्यामूळे ग्रामपंचायतीं चा गावगाडा रूळावर येणार आहे. तसेच ग्रामस्थांना जनसुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: The question of tax evasion of Gram Panchayats will be addressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.