जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:41+5:302021-07-03T04:16:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क म्हालसवडे : शिक्षकांचे संस्कार व प्रामाणिक प्रयत्नांमुळे लॉकडाऊन काळातदेखील कोरोनाचा संसर्ग रोखून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ...

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हालसवडे : शिक्षकांचे संस्कार व प्रामाणिक प्रयत्नांमुळे लॉकडाऊन काळातदेखील कोरोनाचा संसर्ग रोखून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येत आहे. ऑनलाईन शिक्षणासहित गरीब व गरजू मुलांच्या शिक्षणाकरिता करवीर तालुक्यातील शैक्षणिक यंत्रणा सक्रिय आहे, असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांनी व्यक्त केले.
विद्यामंदिर घानवडे (ता. करवीर) येथे करवीर पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक गुणवत्ता विकास सहविचार सभा आयोजित केली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे होते.
कसबा आरळे केंद्रांतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सरपंच यांची सहविचार सभा घेण्यात आली. गुणवत्ता पूर्ण शिक्षणासहित भौतिक विकासाकरिता शुक्रांती भागवत व संदीप माने यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सरपंच प्रकाश कांबळे, बबन कदम, ईश्वरा कांबळे, साताप्पा चौगले, नामदेव तळप, काशिनाथ पाटील उपस्थित होते. आभार प्रमिला तेली यांनी मानले.
०२
फोटो : घानवडे (ता. करवीर) येथील सहविचार सभेत मार्गदर्शन करताना शुक्रांती भागवत, उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, विस्तार अधिकारी विश्वास सुतार आदी मान्यवर.