शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: लग्नपत्रिकेवर छापला क्यूआर कोड, आहेराची रक्कम थेट वृद्धाश्रमास; मंगसुळे कुटुंबियांचा आदर्शवत उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 16:44 IST

ज्यांना आहेर द्यावयाचे आहे, त्यांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून जानकी वृद्धाश्रमाला मदत करा असे केले होते आवाहन

गणपती कोळीकुरुंदवाड : समाजात लग्नकार्यात विधायक उपक्रम राबवून अनेकजण लक्ष वेधून घेतात. यामध्ये विधायक कामापेक्षा प्रसिद्धी मिळविण्याचाच अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र, औरवाड (ता. शिरोळ) येथील माजी उपसरपंच जयवंत शशिकांत मंगसुळे यांनी लग्नात आहेर न स्वीकारता आहेराच्या रूपातून मिळणारी रक्कम घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमाला देण्याचे आवाहन केले व मदतीसाठी वृद्धाश्रमाचा क्यूआर कोड पत्रिकेत छापून हजारो रुपयांची केलेली मदत तालुक्यासह परिसरात चर्चेची ठरली आहे. त्यामुळे या सामाजिक उपक्रमाचा आदर्श घेण्यासारखा आहे.जयवंत मंगसुळे यांचा औरवाड येथे विवाह झाला. घराण्याला राजकीय वलय असल्याने सर्वसामान्यांपासून आमदार, खासदारांपर्यंत सर्वांनाच लग्नाचे निमंत्रण देण्यात आले होते. राजकारणाबरोबर समाजकारणाचीही आवड असल्याने स्वत:च्या लग्न सोहळ्यात आहेर न स्वीकारता आहेराच्या माध्यमातून येणारी रक्कम वृद्धाश्रमाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी लग्नपत्रिकेत आहेर स्वीकारले जाणार नाही, मात्र ज्यांना आहेर द्यावयाचे आहे, त्यांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून जानकी वृद्धाश्रमाला मदत करवा, असे आवाहन करून पत्रिकेत जानकी वृद्धाश्रमाचे स्कॅन कोड छापले होते.लग्न सोहळ्यास येणाऱ्या बहुतेक सर्वच लोकांनी या उपक्रमाचे कौतुक करत उपक्रमाला प्रतिसाद देत पन्नास रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत गुगल पे मदत केली. यातून हजारो रुपयांची मदत वृद्धाश्रमाच्या खात्यावर जमा झाली.समाजात अनेक दातृत्ववान व्यक्ती आहेत. मात्र, अनेकांना मदतीपेक्षा प्रसिद्धीची हाव मोठी असते. मंगसुळे यांनी लग्न सोहळ्याच्या निमित्ताने वृद्धाश्रमाला प्रामाणिकपणे केलेल्या मदतीचा उपक्रम आदर्शवत ठरत आहे.

घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रम मी जवळून पाहिला आहे. या वृद्धाश्रमात सुदृढ वृद्ध कमी, मात्र अपंग, मतिमंद, अंथरुणावर खिळून पडलेल्या वृद्धांची संख्या जास्त आहे. असे असतानाही या वृद्धाश्रमातून वृद्धांची चांगली सेवा केली जात असल्याने ही मदत प्रामाणिकपणे सेवा केल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमाला मिळावी हीच अपेक्षा होती. त्यामुळे आहेराच्या माध्यमातून मदत देणाऱ्यांची मदत सार्थकी झाल्याचे समाधान वाटले. - जयवंत मंगसुळे, औरवाड 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्न