सत्यशोधक बँकेत ‘क्यु आर’ कोड सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:17 IST2021-07-11T04:17:32+5:302021-07-11T04:17:32+5:30
कोल्हापूर : ॲड. शामरावजी शिंदे सत्यशोधक बँकेत ‘क्यु आर’ कोड सुविधा सुरू केल्याची माहिती बँकेच्या अध्यक्ष सुलोचना नाईकवडे ...

सत्यशोधक बँकेत ‘क्यु आर’ कोड सुविधा
कोल्हापूर : ॲड. शामरावजी शिंदे सत्यशोधक बँकेत ‘क्यु आर’ कोड सुविधा सुरू केल्याची माहिती बँकेच्या अध्यक्ष सुलोचना नाईकवडे यांनी पत्रकातून दिली. या माध्यमातून खातेदारांना ऑनलाईन व्यवहारासाठी विनामूल्य सुविधा मिळणार असून, यापूर्वी कोअर बॅंकिंग, सीटीएस क्लिअरींग, आरटीजीएस, एफ. ई. एफ. टी., शासकीय अनुदान विमा योजना बँकेमार्फत सुरु आहे. क्यु आर कोडचे वाटपही करण्यात आले. सध्याच्या डिजिटल संगणक युगात रोख देवघेवीचे व्यवहार कमी हाेत चालल्याने बँकेच्या खातेदारांना त्यांचे व्यवसायातील आर्थिक व्यवहार करण्यासाठी मदत होणार आहे. या सुविधांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष सुलोचना नाईकवडे यांनी केले आहे. आगामी काळात एपीआय, रुपे कार्ड सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष नाईकवडे, उपाध्यक्ष दत्ताजीराव इंगवले यांनी पत्रकात म्हटले आहे.