प्रा. सुधाकर टेके यांना पीएच.डी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:30 IST2021-08-18T04:30:26+5:302021-08-18T04:30:26+5:30
य़ेथील श्री मौनी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंगच्या सिव्हिल विभागातील वरिष्ठ प्राध्यापक सुधाकर शिवराम टेके यांनी डॉक्टरेट ...

प्रा. सुधाकर टेके यांना पीएच.डी
य़ेथील श्री मौनी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंगच्या सिव्हिल विभागातील वरिष्ठ प्राध्यापक सुधाकर शिवराम टेके यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्निकल विद्यापीठात “ॲन इन्वेस्टीगेशन इन ॲनालिसिस ऑफ ड्रिस्टीक्टेड काँक्रिट पाईल्स युजिंग एनडीटी मेथडस अँड देअर रिपेअऱ अँड रेट्रोफिटींग” या विषयावर शोध निबंध सादर केला होता. डॉ. दिलीप कुलकर्णी (धारवाड), प्राचार्य डॉ. के. बी. प्रकाश (हवेरी) यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. श्री मौनी विद्यापीठाचे चेअरमन आशिष कोरगांवकर, संचालक डॉ. आर. डी. बेलेकर आणि विश्वस्त, प्राचार्य जयंत घेवडे यांचे त्यांना प्रोत्साहन मिळाले. या यशाबद्दल प्रा. टेके यांचे श्री मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष पालकमंत्री सतेज पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
१७ सुधाकर टेके पीएचडी