प्रा. शुभांगी सुतार यांना पीएच.डी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:30 IST2021-08-18T04:30:31+5:302021-08-18T04:30:31+5:30
खोची : अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी पेठवडगाव येथील प्राध्यापिका शुभांगी भास्करराव सुतार यांना शिवाजी विद्यापीठाची फार्मसी ...

प्रा. शुभांगी सुतार यांना पीएच.डी.
खोची :
अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी पेठवडगाव येथील प्राध्यापिका शुभांगी भास्करराव सुतार यांना शिवाजी विद्यापीठाची फार्मसी विषयातील पीएच.डी. पदवी मिळाली. याबद्दल त्यांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांच्या हस्ते व विजयसिंह माने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी संचालक बाबासाहेब मुळीक ,प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील उपस्थित होते.
शुभांगी सुतार यांनी "आयडेंटिफिकेशन अँड क्यारायकटरायझेशन ऑफ डिग्रेडेशन प्रॉडक्ट्स अँड इंम्प्युरिटीस ऑफ सम सेलेक्टड ड्रग्स"ह्या विषयावर संशोधन केले. त्यांनी आतापर्यंत २० शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नियतकालिकांमध्ये, तसेच परिषदांमध्ये सादर केले आहेत. संशोधक डॉ. व्ही. सी.येलिगार, प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, डॉ. सौ. एन. एम. भाटिया, डॉ. एस. ए. पिशवीकर, डॉ .प्रफुल्ल चौधरी, डॉ. डी. आर. जडगे यांचे मार्गदर्शन लाभले.