शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

एन. डी. सर आणि कोल्हापुरातील टोल लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 14:47 IST

आयुष्यात त्यांनी अनेक लढे अंगावर घेतले व बलाढ्या राजकीय व खासगी कंपन्यांच्या छाताडावर बसून त्यांनी ते यशस्वी करून दाखविले. 

कोल्हापूर : प्रा.एन.डी.सर आणि लढे याचे आयुष्यभर अतूट नाते राहिले. किंबहुना गोरगरिब कष्टकऱ्यांच्या न्यायाचे लढे हीच त्यांच्या जगण्याची खरी उर्जा राहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून सुरु झालेल्या लढ्याची परंपरा त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम राहिली. आयुष्यात त्यांनी अनेक लढे अंगावर घेतले व बलाढ्य राजकीय व खासगी कंपन्यांच्या छाताडावर बसून त्यांनी ते यशस्वी करून दाखविले. रायगड जिल्ह्यातील सेझला लढा हा रिलायन्स कंपनीविरुध्द होता. परंतू सर मागे सरले नाहीत. कोल्हापूरातील टोललढा हा आयआरबी कंपनीच्या विरोधात होता. परंतू कोल्हापूरातून टोल हद्दपार होण्याचे खरे श्रेय हे एन.डी.सर व ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाचाचे. त्यांच्या वैचारिक नेतृत्वामुळेच या लढा यशस्वी झाला.विरोधातील कंपनीने सगळ्या पातळीवर हा लढा मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याकाळातील राज्यातील काँग्रेस आघाडीचे सरकार हे तसे कंपनीच्या बाजूनेच होते. कारण खासगीकरणाच्या धोरणातून स्विकारलेला हा प्रकल्प मागे घेतला तर देशभर त्याचे परिणाम उमटतील अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची होती. एन.डी.सर त्यासंदर्भातील कोणत्याही बैठकीला गेल्यावर त्यांचे पहिले वाक्य हेच असे की टोल आम्ही देणार नाही....मग मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणायचे टोल देणार नाही अशीच जर कृती समितीचे भूमिका असेल तर या प्रश्र्नांवर चर्चाच होवू शकत नाही. आणि घडलेही तसेच. काँग्रेसच्या काळात हा प्रश्र्न लोंबकळत राहिला.पुढे महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यावर भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयआरबी कंपनीला ४८५ कोटींची भरपाई देवून टोल रद्द करण्याची घोषणा केली व कोल्हापूरची मान टोलच्या जोखडातून मोकळी झाली. सुमारे सहा वर्षे हा संघर्ष सुुरु होता. परंतू त्या सगळ्या आंदोलनात एन.डी.सर कायमच अग्रभागी राहिले. त्यांचे चारित्र्यवान आणि लढाऊ नेतृत्व लाभल्यानेच कंपनीला मान झुकवावी लागली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरN D Patilप्रा. एन. डी. पाटील