शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
4
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
5
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
6
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
7
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
8
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
9
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
10
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
11
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
12
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
13
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
14
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
15
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
16
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
17
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
18
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
20
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी

Kolhapur Politics: विरोधात कितीही ताकद लावा.. लढणारच; समरजित घाटगे यांचा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 16:04 IST

समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

कोल्हापूर : जगातील सगळी ताकद त्यांच्या पाठीशी असली तरी हा समरजित घाटगे त्यांच्याविरोधात उभा राहणारच, असा निर्धार भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी बुधवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याची कागलसह जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नेमका महायुतीचा आज, गुरुवारी कोल्हापुरात मेळावा असतानाच घाटगे यांचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.विरोधक मला एकटे पाडत नसून कागलच्या विकासाला ते एकटे पाडत आहेत. ते कागलच्या भविष्याला एकटे पाडत आहेत. पण, ही निवडणूक कुणाला पराभूत करण्याची नाही तर कागलच्या विकासासाठी परिवर्तन घडवण्यासाठी आहे, त्यासाठी तुम्ही सर्वांनी मला साथ द्या, अशी भावनिक साद घाटगे यांनी घातली. घाटगे यांनी या व्हिडीओच्या सुरुवातीलाच दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांच्या भूमिकेची आठवण करून दिली आहे. लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत मंडलिक यांनी मला अन्य कुणाची मते नाही पडली तरी चालतील, परंतु मला माझे एकतरी मत पडेल की नाही अशी भूमिका घेतली होती, त्या भूमिकेप्रमाणेच मी उभा राहणार, त्यानुसार तुम्ही सर्वांनी ही निवडणूक हातात घ्यायची आहे. समरजित घाटगे यांना ते एकटे पाडत नाहीत. ते कागलच्या विकासाला, भविष्याला एकटे पाडत आहेत. रोज माझ्यावर टीका करत आहेत; पण ही निवडणूक कुणाला पराभूत करण्यासाठी नाहीच.. आपण जेव्हा जिंकतो, तेव्हा कोणतरी पराभूत होतच असते. त्यामुळे ही निवडणूक कागलच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढवायची आहे. सगळ्या युवकांना, महिलांना आवाहन करतो, की आपल्या भविष्याचा विचार करा.. जगातील सगळी ताकद त्यांच्या पाठीशी असली तरी हा समरजित घाटगे त्यांच्याविरोधात उभा राहणारच आणि परिवर्तन घडवणारच.. मी एकच सांगतो, हे परिवर्तन घडवण्यासाठी कोणतीही भूमिका घ्यायला लागो, ती मी घेणार आहे. कोणतीही किंमत मोजायला तयार आहे.. काहीही पावले उचलायला तयार आहे, पण ही निवडणूक मी तुमच्यासाठी लढणारच आहे.. मला आपल्या लोकांनी साथ, आशीर्वाद द्या..

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेvidhan sabhaविधानसभा