शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पशुखाद्याची खरेदीही आता गोकूळमध्येच होणार, संघाचे चांगले पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 13:47 IST

GokulMilk Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघ व संघाच्याच गोकुळ शिरगाव येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याची सर्व प्रकारची खरेदी आता गोकुळच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अधिकाराखालीच एकत्रित करण्याचा निर्णय संघाने सोमवारी घेतला. त्यातून अनावश्यक खरेदीला आळा बसेलच शिवाय संघाचे भांडवल गुंतून पडणार नाही असा दुहेरी हेतू आहे. संघात सत्तांतर झाल्यानंतर दूध उत्पादकांचे पैसे वाचविण्याचे जे अनेक प्रयोग सुरू आहेत, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देपशुखाद्याची खरेदीही आता गोकूळमध्येच होणार, संघाचे चांगले पाऊल कच्चा माल खरेदीत घोटाळा झाल्याचा संशय

विश्वास पाटील कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघ व संघाच्याच गोकुळ शिरगाव येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याची सर्व प्रकारची खरेदी आता गोकुळच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अधिकाराखालीच एकत्रित करण्याचा निर्णय संघाने सोमवारी घेतला. त्यातून अनावश्यक खरेदीला आळा बसेलच शिवाय संघाचे भांडवल गुंतून पडणार नाही असा दुहेरी हेतू आहे. संघात सत्तांतर झाल्यानंतर दूध उत्पादकांचे पैसे वाचविण्याचे जे अनेक प्रयोग सुरू आहेत, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.संघाने घेतलेला निर्णय चांगलाच आहे, परंतु त्याला कारण ठरले आहे ते पशुखाद्य कारखान्यांतील वादग्रस्त खरेदीचे. संघाची निवडणूक तोंडावर असताना पशुखाद्य कारखान्यात कच्च्या मालाची वादग्रस्त खरेदी झाल्याची तक्रार आहे. ही खरेदी संघाच्या तत्कालीन अध्यक्षांच्या तालुक्यातीलच अधिकाऱ्यांकडून झाल्याचे समजते. त्याची रक्कम काही लाखांत आहे. परंतु, निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर आल्यास अडचणी वाढतील म्हणून संघाच्या तत्कालीन मातब्बर नेत्याने त्यावर पांघरूण घातले.

सत्तांतर झाल्यानंतर विद्यमान संचालक मंडळाने या खरेदीबाबत शोध घेतला. परंतु, त्यांच्या हाताला अजून तरी काही लागलेले नाही. परंतु, असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी पशुखाद्याची सर्व खरेदी प्रक्रिया आता गोकुळच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या केबिनमधूनच झाली पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला.महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना वर्षाला एक लाख २० हजार टनांचे पशुखाद्य तयार करतो. त्यामुळे त्यांना दरमहा किमान दहा ते १२ हजार टन कच्चा माल लागतो. पशुखाद्यासाठी मुख्यत: भातकोंडा, मका, राईस पॉलिश, मोहरी, सरकी आणि पामतेलाची पेंड हा माल लागतो. तो पंजाबपासून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व शेजारच्या कर्नाटकातून खरेदी केला जातो. आतापर्यंत या कच्च्या मालासह अन्य इंजिनिअरिंग विभागासाठी लागणारे साहित्यही स्वतंत्रपणे खरेदी केले जात होते. त्यामध्ये फारसा समन्वय नव्हता. म्हणजे पशुखाद्य कारखान्यास ६२०१ क्रमांकाचे बेअरिंग लागत असेल तर ते मागणीपत्र तयार करून खरेदी करत.

हेच बेअरिंग गोकुळ डेअरीकडे आहे का याची चौकशी कधीच होत नसे. त्यामुळे अनेकदा गोकुळ डेअरीकडे काही माल पडून असे व त्याचवेळेला पशुखाद्य कारखान्याकडून त्याच मालाची खरेदी झाल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही खरेदीवर पूर्वीही व्यवस्थापकीय संचालकच सही करत असत. परंतु, त्या वेगवेगळ्या विभागातून होत होत्या. या सर्वाला आता लगाम बसणार आहे.ऑनलाईन यंत्रणागोकुळसह सर्व युनिट व पशुखाद्य कारखान्याची खरेदी यंत्रणा ऑनलाईन विकसित केली जाणार आहे. म्हणजे औषधाच्या दुकानात जसे संगणकावर चेक केल्यावर कोणते औषधे किती प्रमाणात उपलब्ध आहे हे समजते, तसे लागणाऱ्या सर्व वस्तू संघाकडे किती प्रमाणात व कोणत्या शाखेकडे उपलब्ध आहेत याचीही माहिती एका क्लिकवर समजली पाहिजे, अशी यंत्रणा विकसित करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालकांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर