पुणे बससेवा आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:48+5:302021-06-01T04:18:48+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकातून आज, मंगळवारी सकाळी प्रवाशांच्या आग्रहानुसार पुण्यासाठी दोन बसेस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. ...

Pune bus service from today | पुणे बससेवा आजपासून

पुणे बससेवा आजपासून

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकातून आज, मंगळवारी सकाळी प्रवाशांच्या आग्रहानुसार पुण्यासाठी दोन बसेस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रवाशांची मागणी वाढली तर त्यात वाढ केली जाणार आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव यांनी सोमवारी दिली.

गेल्या दीड महिन्यांपासून कोल्हापूर विभागातील एस.टी.ची पुणे, मुंबईकडे जाणारी एस. टी. ची प्रवासी सेवा बंद होती. सोमवारी पुण्याहून दोन बसेस कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात दाखल झाल्या. या बसेससोबत कोल्हापूर विभागाने मंगळवारी प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून प्रथम दोन बसेस या मार्गासाठी सज्ज ठेवल्या आहेत. त्यानंतर आणखी बसेसची प्रवाशांकडून मागणी वाढली तर आणखी बसेस या मार्गावर सोडल्या जाणार आहेत. या सेवेतून जाणाऱ्या प्रवाशांना सरकारच्या कोरोनासंबंधी सर्व सुरक्षा पाळणे बंधनकारक आहे. अत्यावश्यक सेवेतील गडहिंग्लज, राधानगरी, इचलकरंजी, जयसिंगपूर, मुरगुड, रंकाळा-हुपरी, रंकाळा-कागल ही सेवा सुरू आहे. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे तेथून कोल्हापुरात होणारी व कोल्हापुरातून सांगलीकडे होणारी बस वाहतूक यापूर्वीच बंद केली आहे.

Web Title: Pune bus service from today