यंत्रमाग कारखान्यांचे त्वरित पंचनामे करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST2021-07-30T04:25:29+5:302021-07-30T04:25:29+5:30
इचलकरंजी : शहर व परिसरातील पुरामुळे झालेल्या यंत्रमाग कारखान्यांचे त्वरित पंचनामे करून यंत्रमागधारकांना नुकसान भरपाई मिळावी, अशा मागणीचे निवेदन ...

यंत्रमाग कारखान्यांचे त्वरित पंचनामे करावेत
इचलकरंजी : शहर व परिसरातील पुरामुळे झालेल्या यंत्रमाग कारखान्यांचे त्वरित पंचनामे करून यंत्रमागधारकांना नुकसान भरपाई मिळावी, अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी विणकर आघाडीने प्रांत कार्यालयात दिले.
निवेदनात, २२ ते २६ जुलैदरम्यान जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आल्याने महापुराची परिस्थिती निर्माण झाली. पूरग्रस्त भागातील यंत्रमागधारक कोलमडून पडला असून, त्यांच्या कापड व सुताचे मोठे नुकसान झाले आहे. मंदीतून वाटचाल करणाऱ्या या उद्योगाला महापुराचा फटका बसला आहे. त्यांचे नुकसान न भरून येण्यासारखे आहे. २०१९ मधील महापुरावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व निकष बाजूला ठेवून मोठी मदत केली होती. त्याच धर्तीवर ही नुकसानभरपाई त्वरित पंचनामे करून लवकरात लवकर मिळावी, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात अनिल डाळ्या, पै. अमृत भोसले, सतीश पंडित, सचिन कांबळे, प्रवीण रावळ, जगदीश जाधव, दीपक राशिनकर, म्हाळसाकांत कवडे, आदींचा समावेश होता.