शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2024: दुसऱ्या माळेला अंबाबाई गजेंद्रलक्ष्मी रूपात, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 4, 2024 16:37 IST

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला शुक्रवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजेंद्रलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. शुक्रवार हा देवीच्या ...

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला शुक्रवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजेंद्रलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. शुक्रवार हा देवीच्या आराधनेचा दिवस मानला जात असल्याने या दिवशी सकाळपासून भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी दर्शन रांग शेतकरी संघाच्या इमारतीत गेली. अन्य शहरातील भाविकांनी भरलेले बसेसच्या कोल्हापुरात दाखल झाले होते.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईची दुसऱ्या दिवशी गजेंद्रलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. देव व असूर यांच्या समुद्रमंथनातून जी १४ रत्ने निघाली त्यात पहिली निघाली ती लक्ष्मी, हिला कमलालक्ष्मी देखील म्हणतात. हिला गजेंद्रलक्ष्मी किंवा गजलक्ष्मी म्हणतात, कारण ही देवी जेव्हा समुद्रमंथनातून उत्पन्न झाली, तेव्हा तिला हत्तींनी अमृतकुंभाने अभिषेक केला. ही दुर्भाग्याचा नाश करून सर्व सौभाग्य देणारी देवता आहे. हिच्या उपासनेने गजांत धन व समृद्धी लाभते. ऐश्वर्याच्या परमावधीचे प्रतिक म्हणून या देवीची उपासना करतात. ही पूजा श्रीपूजक विद्याधर मुनीश्वर, अरुण मुनीश्वर, मयूर मुनीश्वर यांनी बांधली.

शुक्रवारी नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस होता. घराघरांमध्ये घटस्थापना झाल्याने महिला आता देवदर्शनासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळेच शुक्रवारी पहाटेपासून अंबाबाई मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी मंदिर आणि बाह्य परिसरातदेखील अलोट गर्दी होती.

विधानसभेचा परिणामविधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमधील आजी-माजी आमदारांच्या वतीने महिला मतदारांसाठी देवी दर्शनाची सोय करण्यात आली आहे. त्याचा परिणाम शुक्रवारी दिसून आला. नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी दर्शन रांग भवानी मंडपातील शेतकरी बझारच्या इमारतीपर्यंत गेली. आज शनिवार व रविवारी सलग सुट्ट्या असल्याने त्याहून अधिक गर्दी असणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर