लक्षतीर्थ वसाहतीत रस्त्यात पाण्याची डबकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:25 IST2021-09-26T04:25:37+5:302021-09-26T04:25:37+5:30
कोपार्डे : महानगर पालिकेच्या आरोग्य व बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लक्षतीर्थ वसाहतीत रस्ता व कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला ...

लक्षतीर्थ वसाहतीत रस्त्यात पाण्याची डबकी
कोपार्डे : महानगर पालिकेच्या आरोग्य व बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लक्षतीर्थ वसाहतीत रस्ता व कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचरा कोडाळ्यातील कचऱ्याचा उठाव होत नसल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शहराच्या पश्चिमेला वसलेली लक्षतीर्थ वसाहत यावर्षी आलेल्या महापुरात अडचणीत आली. लक्षतीर्थ वसाहतीत अनेक ठिकाणी नागरी वस्तीत पाणी शिरल्याने लोकांना निवारास्थळाचा आसरा घ्यावा लागला. सध्या या वसाहतीत नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. रस्ते उखडून रस्त्यावर पाण्याची डबकी तयार झाल्यामुळे यावरून उड्यामारतच अथवा वाहनाने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. इंगवले पाणंद, डी.पी रोड, लक्षतीर्थ वसाहत कोविड सेंटर मार्गावरील रस्ते उखडले असून रस्ता खड्ड्यात की खड्डे रस्त्यात हेच समजत नाही. दुसरीकडे लक्षतीर्थमध्ये कचऱ्याचा वेळेत उठाव होत नसल्याने कचराकुंडीतील कचरा रस्त्यावर पसरला आहे. त्यामुळे दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले आहे.
कोट:
लक्षतीर्थ वसाहतीतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत तर कचराकुंडीतील कचरा रस्त्यावर येत आहे. प्रशासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. वेळेवर कचरा उठाव केला जात नाही. कचरा गोळा करण्याऐवजी जेसीबी खासगी कामासाठी लावले जात आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
-भैय्या खेडकर (लक्षतीर्थ वसाहत)
250921\img-20210925-wa0081.jpg
लक्षतीर्थ वसाहतीतील रस्त्याची चाळण झाली आहे. कचराकुंडीतील कचरा रस्त्यावर येत आहे तर कोविड सेंटरला कुलूप आहे