‘सक्सेस स्टोरीज’ पुस्तकाचे प्रकाशन

By Admin | Updated: August 3, 2014 22:45 IST2014-08-03T21:47:39+5:302014-08-03T22:45:51+5:30

आवड निर्माण झाली तर वाचनाने त्यांचे जीवन समृद्ध

Publication of 'Success Stories' book | ‘सक्सेस स्टोरीज’ पुस्तकाचे प्रकाशन

‘सक्सेस स्टोरीज’ पुस्तकाचे प्रकाशन

सातारा : सोशल मीडियाच्या युगामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच वाचनाकडे दुर्लक्ष झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली तर वाचनाने त्यांचे जीवन समृद्ध होईल; पण यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रथम वाचनाची गोडी निर्माण करावी लागले. ‘लोकमत’ने बालविकास मंचच्या सदस्यांसाठी प्रसिद्ध केलेल्या ‘सक्सेस स्टोरीज’ या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती नक्कीच रुजेल, असा विश्वास मुख्याध्यापक व मान्यवरांनी व्यक्त केला.
निमित्त होते... बालविकास मंचतर्फे सभासदांना घेण्यात येणाऱ्या ‘सक्सेस स्टोरीज’ या पुस्तक प्रकाशनाचे येथील ‘लोकमत’ कार्यालयात शनिवारी विविध शाळांमधील मुख्याध्यापक व शहरातील मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
यावेळी डॉ. सुयोग दांडेकर, रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मेघा पवार, सह्याद्री इव्हेन्टस्चे गोरखनाथ जाधव, जे. डब्लू. आयर्न अ‍ॅकॅडमीचे मुख्याध्यापक दीपक महाडिक, शबनम सोमजाळ, ‘लिओ’ क्लबचे अध्यक्ष अक्षय शिंदे, श्रीपतराव पाटील, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रतिभा चव्हाण, कर्मवीर कोचिंग क्लासेसचे संचालक विश्वनाथ गायकवाड उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांना यावेळी ‘लोकमत बालविकास मंच’ची माहिती देण्यात आली. यावर्षी देखील सभासद होणाऱ्या प्रत्येकाला आकर्षक गिफ्टसोबत सक्सेस बुक आणि मोफत सुविधा मिळणार आहेत. शिवाय लकी ड्रॉ मधून बक्षिसेही मिळवता येणार आहेत. सभासदांना लवकरच छोटा भीम आणि क्रिशला भेटण्याची संधी मिळणार आहे. ‘लोकमत’चे उपक्रम नेहमीच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असतात. ‘सक्सेस स्टोरी’च्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्यातील वाचनसंस्कृतीला चालना देण्याचे काम ‘लोकमत’ करत आहे,’ असे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले. ‘सक्सेस स्टोरीज’ या पुस्तकात दिलेले साहित्य, थोर पुरुषांचे विचार हे लहान मुलांच्या जडणघडणीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. यामुळे सशक्त पिढी घडण्यास मदत होईल,’ असे विचार व्यक्त केले. (प्रतिनिधी)
थोरांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार
‘सक्सेस स्टोरीज’ या पुस्तकामध्ये अब्राहम लिंकन, वॉल्ट डिस्रे, एम. एम. हुसेन, चार्ली चॅप्लीन, कल्पना चावला, स्टिव्ह जॉब्स्, यशवंतराव चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेल्सन मंडेला, जे. के. रोलिंग यासारख्या अनेक महान व्यक्तिमत्त्वांची थोडक्यात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. या व्यक्तींच्या आयुष्यातील घटनांच्या आधारे यशस्वी कसे व्हावे, याचे मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

Web Title: Publication of 'Success Stories' book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.