गारगोटीत मराठा महासंघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:23 IST2021-01-25T04:23:55+5:302021-01-25T04:23:55+5:30
गारगोटी : भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि वितरण सोहळा ...

गारगोटीत मराठा महासंघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
गारगोटी : भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि वितरण सोहळा गारगोटीत झाला. युवक नेते राहुल देसाई व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले; तर पोलीस निरीक्षक के. एन.पाटील यांच्या हस्ते वितरण झाले,
यावेळी आनंद चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी प्रवीणसिंह सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, सरपंच संदेश भोपळे, मराठा समाजाचे अध्यक्ष नंदकुमार शिंदे, तुकाराम देसाई, सूर्यकांत चव्हाण, शेणगावचे सरपंच सुरेश नाईक, उपअभियंता आर. के. देसाई, संग्रामसिंह पोफळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वास्कर, सतीश जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद मोरे, सचिन भांदिगरे यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. डॉ. अशोक बाचूळकर यांनी आभार मानले.
२३
फोटो ओळ
गारगाोटी येथे मराठा महासंघाचे दिनदर्शिका प्रकाशन, वितरण नंदकुमार शिंदे, राहुल देसाई, एन. के. पाटील, प्रवीणसिंह सावंत, प्रकाश पाटील, तुकाराम देसाई, आदींच्या उपस्थितीत झाले.