रोहित पवार यांच्या हस्ते वार्षिक ‘अर्पण’चे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST2021-07-31T04:24:01+5:302021-07-31T04:24:01+5:30
यावर्षीच्या 'अर्पण' वार्षिकांकामध्ये 'एक्सपर्ट व्हाईस' या सदरामध्ये उत्कृष्ट व प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती घेतल्या जातात. यावर्षीच्या अंकात ज्येष्ठ समाजसेविका ...

रोहित पवार यांच्या हस्ते वार्षिक ‘अर्पण’चे प्रकाशन
यावर्षीच्या 'अर्पण' वार्षिकांकामध्ये 'एक्सपर्ट व्हाईस' या सदरामध्ये उत्कृष्ट व प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती घेतल्या जातात. यावर्षीच्या अंकात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, रोहित पवार, निवृत्त न्यायाधीश जी. डी. इनामदार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विद्यार्थी प्रतिनिधींनी घेतलेल्या मुलाखतींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या साहित्यिक गुणांना वाव देण्याच्या हेतूने 'अर्पण'ची निर्मिती केली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांनी लिहिलेली कविता, लेख, नवीन नवीन तांत्रिक कल्पना यांचा समावेश असतो. प्रकाशन समारंभाला आमदार चंद्रकांत जाधव व ‘गोकुळ’चे संचालक नवीद मुश्रीफ, प्राचार्य डॉ. संतोष चेडे उपस्थित होते.
फोटो : ३० अर्पण प्रकाशन
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या वार्षिक 'अर्पण' चे प्रकाशन करताना आमदार रोहित पवार, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, नविद मुश्रीफ उपस्थित होते.