ॲपद्वारे स्वच्छता अभियान’ जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST2021-01-22T04:22:17+5:302021-01-22T04:22:17+5:30
कोल्हापूर : मैला सफाई कामगारांचे पुनर्वसन करून त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ‘स्वच्छता अभियान’ या ॲपद्वारे जनजागृती करावी, अशा सूचना ...

ॲपद्वारे स्वच्छता अभियान’ जनजागृती
कोल्हापूर : मैला सफाई कामगारांचे पुनर्वसन करून त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ‘स्वच्छता अभियान’ या ॲपद्वारे जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्याधिकारी सर्व नगरपरिषद, नगरपंचायतींना दिल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेत आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच मैला साफ करणाऱ्यांचे पुनर्ववसन करुन त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ‘स्वच्छता अभियान’ या ॲपद्वारे जनजागृती करावी. लोकांना उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्यासाठी मोबाईल अनुप्रयोगाबद्दल व्यापक धोरण निश्चित करावे, असेही ते म्हणाले.
----
पेट शॉप व डॉग ब्रिडिंग सेंटरची नोंदणी करा
कोल्हापूर : प्राणी कल्याण मंडळाची नोंदणी केल्याशिवाय जिल्ह्यात कोणतेही पेट शॉप व डॉग ब्रिडिंग सेंटर सुरू न करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी बुधवारी केले आहे.
प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, पाळीव प्राणी दुकान नियमातील तरतुदीनुसार राज्यातील पाळीव प्राण्यांची दुकाने तसेच श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ, पुणे यांच्याकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे तरी ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका येथील कर्मचाऱ्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करून कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या पेट शॉप व डॉग ब्रिडिंग सेंटर यांना ३० दिवसांत नोंदणी करून घेण्यासाठी नोटीस द्यावी, असेही पठाण त्यांनी कळविले आहे.