पंधरा दिवस शहरास अपुरा पाणीपुरवठा

By Admin | Updated: May 13, 2015 00:48 IST2015-05-13T00:13:36+5:302015-05-13T00:48:13+5:30

पाणी जपून वापरण्याचे आवाहन : बालिंगा उपसा केंद्रातील पंप बदलण्याचे काम सुरू

Providing insufficient water to the city for fifteen days | पंधरा दिवस शहरास अपुरा पाणीपुरवठा

पंधरा दिवस शहरास अपुरा पाणीपुरवठा

कोल्हापूर : बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील पाणी उपसा करणारी यंत्रणा बदलण्याचे काम महापालिकेने मंगळवारपासून हाती घेतले आहे. हे काम पूर्ण होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने शहरातील ए, बी, सी, डी वॉर्ड व त्यास संलग्नित ग्रामीण भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन शहर पाणीपुरवठा विभागाने पत्रकाद्वारे केले आहे.
बालिंगा येथील उपसा केंद्रातील यंत्रणेत वारंवार बिघाड होत आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणेचे नूतनीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एक-एक करीत सर्व यंत्रणा बदलण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ए, बी, सी, डी वॉर्डांतील अनेक भागांत अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मंगळवारपासून यंत्रणा बदलण्याच्या कामास सुरुवात झाली. हे काम पूर्ण होण्यास किमान १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे.
या नूतनीकरण कामाचा आपटेनगर परिसर, सानेगुरुजी वसाहत, रिंग रोड संलग्नित परिसर, रायगड कॉलनी, शिवाजी पेठ व मंगळवार पेठ परिसर, देवकर पाणंद, रंकाळा व गंगावेश परिसर, पापाची तिकटी, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर, बिंदू चौक व लक्ष्मीपुरी परिसर, फुलेवाडी व लक्षतीर्थ वसाहत, आदींसह ए, बी, सी व डी वॉर्डांसह ई वॉर्डातील शाहूपुरीच्या काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
शहरवासीयांसाठी दररोज महापालिका शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रांतून १२० दशलक्ष लिटर्स पाण्याचा उपसा करते. बालिंगा उपसा केंद्रात काम सुरू असले तरी इतर दोन केंद्रांतून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा केला जाणार आहे. नागरिकांना पाणी कमी पडू नये, याची खबरदारी घेतल्याचे प्रशासनाने पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)


सर्व यंत्रणेचे नूतनीकरण
ए, बी, सी, डी वॉर्ड व त्यास संलग्नित ग्रामीण भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार
बालिंगा येथील उपसा केंद्रातील यंत्रणेत वारंवार बिघाड होत आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणेचे नूतनीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
हे काम पूर्ण होण्यास किमान १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे.

Web Title: Providing insufficient water to the city for fifteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.