ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना माहिती पुस्तिका देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST2020-12-09T04:19:23+5:302020-12-09T04:19:23+5:30
लाटवडे (ता. हातकणंगले) येथे कारखान्याच्यावतीने आयोजित शिवार भेट कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ऊसशेती अभ्यासक सुरेश माने होते, तर ...

ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना माहिती पुस्तिका देणार
लाटवडे (ता. हातकणंगले) येथे कारखान्याच्यावतीने आयोजित शिवार भेट कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ऊसशेती अभ्यासक सुरेश माने होते, तर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने प्रमुख उपस्थित होते. निवृत्त कृषी अधिकारी जे. पी. पाटील यांच्या शेतावर हा कार्यक्रम झाला.
कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून उसाचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन केले.
सुरेश माने यांनी ‘शाश्वत ऊस शेती’ या विषयावर व्याख्यान दिले. ते म्हणाले, एकरी शंभर टन ऊस उत्पादन काढण्यासाठी शेतातील सेंद्रिय कर्ब कसा वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हळद, हरभरा, केळी या पिकांचा बेवड यासाठी अधिक उपयोगी ठरतो. सेंद्रिय, रासायनिक, जैविक खतांचा संतुलित आहार उसाला दिला पाहिजे. मुळातच उसाच्या बियाण्यांची निर्मिती शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील उसापासून बियाणे प्लॉट तयार करून केल्यास अधिक फायद्याचे ठरते. दोन टिपरातील अंतर दीड फूट ठेवून साडेचार फूट सरीत लागण केल्यास उत्पादन वाढते. खते मातीआड केली पाहिजेत. त्यामुळे अधिक चांगला परिणाम होतो. यावेळी जे. पी. पाटील, अमर पाटील, आर. एच. पाटील, श्रीकांत पाटील, उत्तम पाटील, अशोक माळी, नागनाथ पाटील, बाजीराव पाटील, सर्जेराव पाटील, शेती अधिकारी बी. ए. आवटे, विनायक पाटील, आप्पासाहेब पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी-लाटवडे येथे शिवार भेट कार्यक्रमात माजी आमदार अमल महाडिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आर. एच. पाटील, सुरेश माने, सर्जेराव माने, जे. पी. पाटील उपस्थित होते.(छाया-आयुब मुल्ला)
०८ खोची अमल महाडिक