पूरग्रस्तांना शासकीय मदत तातडीने द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST2021-09-08T04:31:36+5:302021-09-08T04:31:36+5:30

जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे बाजारपेठेत आल्याने आमच्या दुकानांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. महसूल ...

Provide immediate government assistance to flood victims | पूरग्रस्तांना शासकीय मदत तातडीने द्या

पूरग्रस्तांना शासकीय मदत तातडीने द्या

जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे बाजारपेठेत आल्याने आमच्या दुकानांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

महसूल विभागाने नुकसानीचे दोन वेळा पंचनामे केले असून, आम्हास ते मान्य असतानाही प्रत्यक्षात मात्र मदत मिळण्यास विलंब होत आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनने व त्यानंतर आलेल्या महापुरामुळे व्यापारी व दुकानदार दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

केवळ राजकीय हेतूने जाणूनबुजून काहीजण शासकीय मदत मिळण्यामध्ये आडचण आणत आहेत. शासनाने केलेल्या मूल्यांकनाप्रमाणे व प्रसिद्ध केलेल्या नुकसान भरपाईच्या यादीप्रमाणे व्यापारी व दुकानदारांच्या खात्यावर रक्कम वर्ग करावी अशीही मागणीही निवेदनात केली आहे.

सुमारे ३५० व्यापारी व दुकानदारांच्या मागणीचे निवेदन महसूल विभागास मंडल अधिकारी सुरेश ठाकरे व तलाठी संदीप कांबळे यांच्याकडून देण्यात आले.

या वेळी मनोहर पाटील ,अनिल दंताळ, सुरेश पोवार, राजेंद्र देसाई , गजानन कालेकर , गोविंद पाखरे आदी पूरग्रस्त दुकानदार व व्यापारी उपस्थित होते.

Web Title: Provide immediate government assistance to flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.