महापूर नुकसानभरपाई आणि शेतकरी अनुदान तातडीने द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:28 IST2021-09-04T04:28:46+5:302021-09-04T04:28:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कागल : महापुरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई व दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेले प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ...

महापूर नुकसानभरपाई आणि शेतकरी अनुदान तातडीने द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : महापुरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई व दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेले प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यासाठी महाविकास आघाडीचे शासन कोणता मुहूर्त बघत आहे? असा प्रश्न भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून विचारला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, अशी घोषणा केली होती. कर्जमाफी योजनेत प्रामाणिक शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आम्ही आवाज उठवला होता. त्यानंतर शासनाने या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र, अद्याप त्याचाही पत्ता नाही. कोरोना व महापूर अशा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी व नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. आजघडीस बहुतांशी पंचनामे पूर्ण झाले आहेत. महापुरात झालेल्या नुकसानाची भरपाई तसेच प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना ताबडतोब द्यावे. अन्यथा शेतकरी व नागरिकांच्या फार मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल. हे लोक आपल्या न्याय मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.