चंदगड तालुक्यात लाभार्थ्यांना घरकुले प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:17 IST2021-06-22T04:17:20+5:302021-06-22T04:17:20+5:30
यावेळी पंचायत समिती सभापती अॅड. अनंत कांबळे, उपसभापती मनीषा शिवणगेकर, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना नवीन घरांच्या ...

चंदगड तालुक्यात लाभार्थ्यांना घरकुले प्रदान
यावेळी पंचायत समिती सभापती अॅड. अनंत कांबळे, उपसभापती मनीषा शिवणगेकर, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना नवीन घरांच्या चाव्या देण्यात आल्या.
यावेळी विस्तार अधिकारी अमृता देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाआवास अभियानासंबंधी माहिती दिली.
यावेळी सुनील कुंदेकर (अडकूर), श्रीमंता पाटील (केंचेवाडी), वसंत कांबळे व बळे कांबळे (बुझवडे), आनंदी गावडे (आसगाव) येथील लाभार्थ्यांना पूर्णत्वास आलेल्या घरकुलाच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.
घरकुल योजनेंतर्गत तालुक्यात विस्तार अधिकारी देशपांडे यांनी केलेल्या कामाचे उपसभापती शिवणगेकर यांनी कौतुक केले.
यावेळी गृहनिर्माण अभियंता रज्जत हुलजी, धैर्यशील यादव, शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, अनिल शिवणगेकर आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : चंदगड पंचायत समितीमध्ये महाआवास घरकुल योजनेतंर्गत लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या प्रदान करताना सभापती अॅड. अनंत कांबळे, उपसभापती मनीषा शिवणगेकर, गटविकास अधिकारी बोडरे आदी उपस्थित होते.
क्रमांक : २१०६२०२१-गड-०२