महापुरातील विविध कामांसाठी ५८ कोटींचा निधी उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:23 IST2021-08-01T04:23:08+5:302021-08-01T04:23:08+5:30

: पालकमंत्री सतेज पाटील यांना निवेदन इचलकरंजी : महापुरामुळे पूरग्रस्त भागातील खचलेले ३५ रस्ते दुरुस्ती, शहरातून वाहणाऱ्या काळ्या ओढ्यावरील ...

Provide funds of Rs. 58 crores for various works in Mahapura | महापुरातील विविध कामांसाठी ५८ कोटींचा निधी उपलब्ध करा

महापुरातील विविध कामांसाठी ५८ कोटींचा निधी उपलब्ध करा

: पालकमंत्री सतेज पाटील यांना निवेदन

इचलकरंजी : महापुरामुळे पूरग्रस्त भागातील खचलेले ३५ रस्ते दुरुस्ती, शहरातून वाहणाऱ्या काळ्या ओढ्यावरील ५ बंधाऱ्यांवर पूल बांधणे, आवाडे सबस्टेशनची उंची वाढविणे, पाणंद रस्त्यांची दुरुस्ती व मजरेवाडी व पंचगंगा जॅकवेल येथे सबमर्सिबल पंप यासाठी आवश्यक ५८ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशा मागण्यांचे निवदेन आमदार प्रकाश आवाडे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, महापुरामुळे शहर व परिसरातील नदीकाठच्या अनेक रस्त्यांचे तसेच मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शहरातील पूरग्रस्त भागातील ३५ रस्ते खचले असून खड्डे पडल्याने खराब झाले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. काळ्या ओढ्यास जोडणारे आरगे भवन, स्लॉटर हाऊस, बोहरा मार्केट, आमराई रस्ता, सोलगे मळा हे ५ बंधारे असून या बंधाऱ्यांच्या ठिकाणी अतिवृष्टीवेळी पुराचे पाणी पूर्ण क्षमतेने वाहून जात नसल्यामुळे सांडपाणी गावात शिरून नागरिकांच्या घरात शिरते. या बंधार्‍यांवर पूल उभारण्याची गरज आहे. त्यासाठी १२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पाणंद रस्ते पूर कालावधीत पाण्याखालीच राहत असल्याने खराब होतात. शासनाकडून मंजुरीवेळी वगळण्यात आलेल्या १८.३४ कोटींच्या पाणंद रस्ते प्रस्तावास नव्याने प्रशासकीय मंजुरी मिळावी, मजरेवाडी जॅकवेल येथे ५४० अश्‍वशक्तीचे व पंचगंगा जॅकवेल येथे २५० अश्‍वशक्तीचे दोन सबमर्सिबल पंप बसविल्यास महापुरातसुद्धा इचलकरंजीस विनाव्यत्यय पाणी पुरवठा करणे शक्य होईल. त्यासाठी अंदाजे ५ कोटी इतका खर्च अपेक्षित असून तो निधी आपत्ती व्यवस्थापन योजनेंतर्गत मंजूर करण्यात यावा, असेही म्हटले आहे.

Web Title: Provide funds of Rs. 58 crores for various works in Mahapura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.