कोल्हापूर : जिल्ह्यातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करणेसाठी आवश्यक असणारा निधी तातडीने मिळावा, अशा मागणीचे निवेदन खासदार संजय मंडलिक यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोमवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पूर परिस्थितीच्या आढावा घेण्यासाठी मंंत्री पाटील आले होते. त्यावेळी मंडलिक यांनी निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे, जिल्हयातील धामणी, आंबेओहळ, सर्फनाला, उचंगी (ता. आजरा), नागनवाडी (ता. भुदरगड) तसेच सोनुर्ले (ता. शाहूवाडी) ही धरणे अनेक वर्षापासून रखडली आहेत. ही धरणे पूर्ण करण्यासाठी निधी मिळावा. निवेदन देताना आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सुर्वे, पुनर्वसन अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, अर्धवट धरणाचे काम पूर्ण होण्यासाठी निधीची उपलब्ध केली जाईल. यासाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी खासदार मंडलिक यांना दिले.राधानगरी धरणास सर्व्हिस गेटराधानगरी धरणास सात स्वयंचलित दरवाजे आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच दरवाजे उचलतात. पण येथे सर्व्हिस गेटचे ऑटोमायजेशन केल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु होईल. पुरावर नियंत्रण ठेवणे सोपे होईल. गेटसाठी सुमारे चार कोटी निधींची आवश्यकता आहे, याकडेही निवदेन देताना खासदार मंडलिक यांनी लक्ष वेधले.
जिल्ह्यातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 13:51 IST
Irrigation Projects Sanjay Mandalik Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करणेसाठी आवश्यक असणारा निधी तातडीने मिळावा, अशा मागणीचे निवेदन खासदार संजय मंडलिक यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोमवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पूर परिस्थितीच्या आढावा घेण्यासाठी मंंत्री पाटील आले होते. त्यावेळी मंडलिक यांनी निवेदन दिले.
जिल्ह्यातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करा
ठळक मुद्देजिल्ह्यातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करा खासदार संजय मंडलिक यांची मागणी