स्थानिक तरुणांनाच रोजगाराची संधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:27+5:302021-07-18T04:18:27+5:30
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील युवक-युवतींना, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ...

स्थानिक तरुणांनाच रोजगाराची संधी द्या
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील युवक-युवतींना, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक शनिवारी रोजगार मेळावा घेण्यात येत आहे. युवकांनी या रोजगार मेळाव्याच्या संधीचे सोने करून घ्यावे. जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळावा हाच फाउंडेशनचा उद्देश आहे. स्थानिक उद्योजकांनी स्थानिक तरुणांनाच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले.
कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील लालबहादूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित रोजगार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
आलास, बुबनाळ, शेडशाळ, गणेशवाडी, कवठेगुलंद, औरवाड व गौरवाड या गावांमधील युवकांची रोजगाराची समस्या सोडविण्याचा प्रयत्न म्हणून या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी एकूण ८४ युवक-युवतींची नोकरीसाठी निवड झाली.
प्रारंभी स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्जेराव पवार, सर्जेराव शिंदे, अविनाश कदम यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शेखर पाटील, भैयासाहेब पाटील, अशोक पाटील, दीपाली भंडारे, प्रा. मोहन पाटील, महेश परीट, दीपक कांबळे, शीतल उपाध्ये, संजय गुरव, पंकज शहापुरे, शंकर कांबळे उपस्थित होते. चंद्रकांत कलगी यांनी सूत्रसंचालन, तर फैसल पटेल यांनी आभार मानले.
फोटो - १७०७२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथे रोजगार मेळाव्याचे उद्घाटन गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्जेराव पवार, सर्जेराव शिंदे, अविनाश कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.