राष्ट्रीय सेवा योजनेचे कोरोना काळातील कार्य अभिमानास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:27+5:302021-06-19T04:17:27+5:30

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजनाच्यावतीने ‘माझं गाव, कोरोनामुक्त गाव’ हे अभियान सातारा जिल्ह्यात १४० गावांत सुरू ...

Proud of the work of the Corona period of the National Service Plan | राष्ट्रीय सेवा योजनेचे कोरोना काळातील कार्य अभिमानास्पद

राष्ट्रीय सेवा योजनेचे कोरोना काळातील कार्य अभिमानास्पद

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजनाच्यावतीने ‘माझं गाव, कोरोनामुक्त गाव’ हे अभियान सातारा जिल्ह्यात १४० गावांत सुरू आहे. या अनुषंगाने कोरोना योद्धा समिती, ग्रामस्थ स्वयंसेवक-स्वयंसेविका यांना मार्गदर्शनपर उपक्रमाअंतर्गत वेबिनार घेण्यात आला. त्यामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील होते. सातारा जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्त होण्याकडे असली, तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे आपण गाफील राहता कामा नये, असे आवाहन अजयकुमार बन्सल यांनी केले. कोरोनाच्या स्थितीत जनजागृती, समुपदेशनातून मानसिक आधार, आरोग्यविषयक मार्गदर्शनाची गरज ओळखून राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून गावपातळीवरील कार्याची जबाबदारी घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या बरोबरीने विद्यापीठाचे स्वयंसेवक काम करीत आहेत, याचा अभिमान वाटतो, असे प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी सांगितले. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले. आनंद घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Proud of the work of the Corona period of the National Service Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.