इचलकरंजीत विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:00+5:302021-07-18T04:18:00+5:30
इचलकरंजी : राज्य शासनाने पायी वारीसाठी परवानगी नाकारली आहे. तसेच ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना नजर कैदेत ठेवले आहे. ...

इचलकरंजीत विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे निदर्शने
इचलकरंजी : राज्य शासनाने पायी वारीसाठी परवानगी नाकारली आहे. तसेच ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना नजर कैदेत ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर येथील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यावतीने शहरातील अनेक चौकांत राज्य शासनाचा निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली. त्यानंतर प्रांत कार्यालयात मागण्यांचे निवेदन दिले.
वारीस शेकडो वर्षांची परंपरा असून अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरात येत असतात. प्रत्येक दिंडीसोबत किमान दोन वारकऱ्यांना, तसेच मानाच्या पालखीसोबत ४० ते ५० वारकऱ्यांना कोरोनाचे नियम पाळून परवानगी द्यावी. या प्रमुख मागण्या केल्या आहेत. शासनाने वारकऱ्यांवर बळाचा वापर करून ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक केली आहे. तसेच निरपराध भाविकांना अटक केली आहे. त्यांची मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी. संतांवरील गुन्हे मागे घ्यावेत. राज्य शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. या वेळी संतोष हत्तीकर, बाळासाहेब ओझा, प्रवीण सामंत, रणजित पवार, संतोष मुरदंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
१७ इचलकरंजी व्हीएचपी
फोटो ओळी
इचलकरंजी : येथील मलाबादे चौकात राज्य शासनाच्या विरोधात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलतर्फे निदर्शने करण्यात आली.