राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:30 IST2021-08-25T04:30:36+5:302021-08-25T04:30:36+5:30

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत हुकुमशाही पद्धतीने अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ ...

Protests in Kolhapur against Rane's arrest | राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरात निदर्शने

राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरात निदर्शने

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत हुकुमशाही पद्धतीने अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने बिंदू चौक येथे मंगळवारी संध्याकाळी जोरदार निदर्शने करून सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौक येथे एकत्र येत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच घडली आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, लोकशाहीच्या दृष्टीने आजचा दिवस निंदनीय म्हणावा लागेल. सर्वसामान्य जनता या तिघाडी सरकारचा तालिबानी कारभार प्रत्यक्ष अनुभवत असून आगामी काळात त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही."

याप्रसंगी भाजप सरचिटणीस गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, मारुती भागोजी, सचिन तोडकर, अजित सूर्यवंशी, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, विजय खाडे-पाटील, आशिष कपडेकर, डॉ.राजवर्धन, सुधीर देसाई, विवेक कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Web Title: Protests in Kolhapur against Rane's arrest