महागाई विरोधात ‘भाकप’तर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST2021-07-01T04:17:30+5:302021-07-01T04:17:30+5:30

कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने महागाईच्या विरोधात मध्यवर्ती बसस्थानक परिसरात निदर्शने केली. पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात पक्षाच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात ...

Protests by CPI (M) against inflation | महागाई विरोधात ‘भाकप’तर्फे निदर्शने

महागाई विरोधात ‘भाकप’तर्फे निदर्शने

कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने महागाईच्या विरोधात मध्यवर्ती बसस्थानक परिसरात निदर्शने केली. पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात पक्षाच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.

‘भाकप’चे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे म्हणाले, पेट्रोल, डिझेलचा दर कमी आहे. मात्र, त्यापेक्षा त्यावरील करांचे प्रमाण जास्त आहे. वाहतूक खर्च, डीलरचे कमिशन, केंद्राकडून आकारण्यात येणारे उत्पादन शुल्क आणि व्हॅट यांच्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होते. पेट्रोलच्या दरातील करांचा वाटा ६० टक्के आहे. तर डिझेलच्या बाबतीत हे प्रमाण ५५ टक्के इतके आहे.

नामदेव गावडे म्हणाले, केंद्राने एकीकडे इंधनाच्या दरात वाढ करत असताना दुसऱ्या बाजूला रोजगार निर्मितीमध्ये देखील कपात करत आहे. त्यामुळे १ कोटी ९ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

रघुनाथ कांबळे म्हणाले, चीनमध्ये ७२ रुपये ६५ पैसे, नेपाळमध्ये ६७ रुपये ४१ पैसे, रशियामध्ये ४२ रुपये ६९ पैसे, पाकिस्तानमध्ये ५१ रुपये १२ पैसे, भूतानमध्ये ४९ रुपये ५६ पैसे, श्रीलंकेमध्ये ६२ रुपये ८० पैसे, बांगलादेशमध्ये ७६ रुपये ४३ पैसे इतके पेट्रोलचे दर आहेत. त्याप्रमाणे डिझेलचे दर असून भारतात मात्र केवळ अतिरिक्त कराच्या माध्यमातून लोकांची लूट सुरू आहे.

नामदेव पाटील, दिलदार मुजावर, शिवाजी माळी आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : भाकप तर्फे बुधवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात महागाई विरोधात निदर्शने करण्यात आली. (फोटो-३००६२०२१-कोल-भाकप) (छाया- नसीर अत्तार)

Web Title: Protests by CPI (M) against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.