शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा बांधवांवर लाठीहल्ला, कोल्हापुरात निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 11:28 IST

'चळवळच मोडीत काढल्यास त्याची किंमत आगामी काळात मोजावी लागेल'

कोल्हापूर : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा निषेध येथील शिवाजी चौकात शुक्रवारी रात्री सकल मराठा समाजातर्फे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. लवकरच बैठक घेऊन मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा काय असेल हे ठरवण्याचेही यावेळी जाहीर केले. लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यात २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे काही सहकाऱ्यांसोबत उपोषणाला बसले होते. त्यांच्यासह मराठा आंदोलकांवर पोलिसांनी जोरदार लाठीहल्ला केला. त्याचे पडसाद येथे उमटले. येथील शिवाजी चौकात मराठा समाजाचे नेते, पदाधिकारी एकत्र येत निषेध नोंदवला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, ॲड. बाबा इंदूलकर, रविकिरण इंगवले, विजय देवणे, सरदार पाटील, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, चंद्रकांत चव्हाण, सरदार पाटील, प्रताप नाईक, विजय पाटील, मनजित माने, दीपक मुळीक, प्रतीक साळुंखे, प्रणव डाफळे, विराज पाटील, निल मुळीक, प्रसाद पाटील, महादेव जाधव, शाहीर डिलिओ सावंत, उदय लाड, सचिन जगदाळे, किशोर डवंग, अवधूत पाटील आदी सहभागी झाले होते.

आपल्या न्याय्य हक्कांसाठी उपोषण करणाऱ्या मराठा समाजावर अमानुषपणे केलेला लाठीमार पूर्वनियोजित कट असल्याचा संशय आहे. आता सत्तेत असणाऱ्यांची केंद्रातही सत्ता आहे. त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याऐवजी लाठीमार केला आहे. त्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मराठा आंदोलकांना मारहाण करणाऱ्या सरकारला आगामी काळात समाज धडा शिकवेल. - संजय पवार, जिल्हाप्रमुख, कोल्हापूर 

जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. अश्रधुराच्या नळकांड्या फोडल्या. अनेक वर्ष भिजत असलेला प्रश्न न सोडवल्याने मराठा समाजाच्या भावना तीव्र होणे साहजिकच आहे. प्रश्न कौशल्याने हाताळण्याऐवजी लाठीमार करून चळवळच मोडीत काढल्यास त्याची किंमत आगामी काळात मोजावी लागेल. - राजू शेट्टी, माजी खासदार, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

कोणत्याही निशस्त्र आंदोलकांवर लाठीमार करणे हे हिटलरशाहीचे लक्षण आहे. आपली वाटचाल हुकूमशाहीकडे नेत असल्याचे सरकार दाखवून देत आहे. सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न कधीच सोडवायचा नव्हता. सत्तेत नसताना देखील सत्ताधारी पक्षांनी या प्रश्नाचे फक्त राजकारणच केले. मराठा आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांवर दडपशाही करून आपले खरे रूप सरकारने दाखवून दिलेले आहे. याचा आम्ही निषेध करतो. - सतीशचंद्र कांबळे, जिल्हा सेक्रेटरी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjalna-acजालनाMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा