शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठाकरे गटाचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी

By समीर देशपांडे | Updated: April 12, 2023 13:14 IST

अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसेनेचा काही संबंध नव्हता असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ केले आंदोलन

कोल्हापूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. कोल्हापुरात आज, बुधवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध केला. अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसेनेचा काही संबंध नव्हता अशा पद्धतीचे वक्तव्य पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्याच्या निषेधार्थ आज हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पाटील यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. राजकारणाच्या बाबतीत कुठेही नाक खूपसून प्रसार माध्यमातून आपण वेगळे आहोत हे दाखवून देण्याचा पाटील यांचा जुना धंदा आहे अशा शब्दात जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पाटील यांचा समाचार घेतला आहे. यावेळी शहर प्रमुख सुनील मोदी. रवी इंगवले यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी मुलाखतीत केले होते. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. "मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यात सहभाग घेतलेले लोक बजरंग दल, विहिंप (विश्व हिंदू परिषद) किंवा दुर्गा वाहिनीचे होते", असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.अमित शाहांच्या भेटीनंतर आशिष शेलारांचे खडे बोलचंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर भाजपमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला आहे. पाटील यांना हे वक्तव्य टाळता आले असते, असे खुद्द भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे. तसेच, पाटील यांनी केलेले वक्तव्य हे वैयक्‍तिक मत असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्यावर शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन