शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

जीवावर बेतली पिकांची रखवाली, शेतकरी भाऊ सापडले अस्वलांच्या तावडीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 17:42 IST

रात्री दहाच्या सुमारास शेताकडून घरी निघालो होतो, रात्रीच्या अंधारात समोरून आलेल्या दोन अस्वलांनी आमच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. गव्यांना हुसकावून आलो..पण, सापडलो अस्वलांच्या तावडीत. नशीब बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो. या घटनेचा साक्षीदार असणाऱ्या सुरेशकडून हल्याचा थरार ऐकणाऱ्यांच्या अंगावरही काटे उभारल्यावाचून राहत नाहीत.

ठळक मुद्देजीवावर बेतली पिकांची रखवाली, पिळणीतील प्रसंग शेतकरी भाऊ सापडले अस्वलांच्या तावडीत !

राम मगदूम

गडहिंग्लज  : रात्री दहाच्या सुमारास शेताकडून घरी निघालो होतो, रात्रीच्या अंधारात समोरून आलेल्या दोन अस्वलांनी आमच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. गव्यांना हुसकावून आलो..पण, सापडलो अस्वलांच्या तावडीत. नशीब बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो. या घटनेचा साक्षीदार असणाऱ्या सुरेशकडून हल्याचा थरार ऐकणाऱ्यांच्या अंगावरही काटे उभारल्यावाचून राहत नाहीत.हकीकत अशी, चंदगडपासून १५ किलोमीटर अंतरावर आणि बाजार कानूरपासून ६ किलोमीटरवर सुमारे ९०० लोकवस्तीचे पिळणी गाव आहे. त्या गावात रविवारी (१९) रात्री ही घटना घडली. त्यात उत्तम तुकाराम गावडे (वय ३६) हा गंभीर जखमी झाला आहे. अस्वलाने लचके तोडल्यामुळे त्याच्या डाव्या पायाला सुमारे ९० टाके पडले आहेत.जंगल क्षेत्र आणि फाटकवाडी धरणाच्या पाण्यामुळे अलिकडे पिळणीसह परिसरातील आजूबाजूच्या खेड्यातील शिवारात जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. रानगवे, अस्वल, हत्ती आदी जंगली प्राणी याठिकाणी जणू मुक्कामालाच आहेत. घटप्रभा बारमाही झाली तरी एकही पीक हाताला लागणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना रात्रं-दिवस पिकांची रखवाली करावी लागते.रविवार (१९) रात्री सुरेश व त्याचा लहान भाऊ उत्तम दोघेही नेहमीप्रमाणे गव्यांच्या रखवालीसाठी पिळणीपासून सुमारे २ किलोमीटरवर असणाऱ्या भात शेतीकडे गेले होते. तोंडाने आवाज काढून व डब्बे वाजून त्यांनी रानगव्यांना हुसकावून लावले. गवे माघारी परतल्यानंतर त्यानी घरची वाट धरली.दरम्यान, गावालगतच्या पाणंद रस्त्यात समोरून आलेल्या दोन अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला. काठीशिवाय दोघांच्याही हातात कांहीच नव्हते. समोर असणाऱ्या उत्तमला खाली पाडून अस्वलाने त्याच्या पायाचे लचके तोडायला सुरूवात केली. त्यावेळी सुरेशने जीवाच्या आकांताने आरडाओरडा करून अस्वलांना काठीने हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अस्वलांनी जंगलाकडे धूम ठोकली.जखमी उत्तमला सुरेशने खांद्यावरून गावात नेले. त्यानंतर त्याला सरपंच लक्ष्मण चव्हाण यांच्या चारचाकीतून चंदगड ग्रामीण रूग्णालयात व त्यानंतर गडहिंग्लजच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले, तोपर्यंत रात्रीचे बारा वाजून गेले होते.आमने-सामने..!पिळणीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पाणंदीच्या वळणावर गावाकडून जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या अस्वलांची आणि शेताकडून घराकडे जाणाऱ्या गावडे बंधूंची आमने-सामने गाठ पडली. त्यामुळे दोघांची घाबरगुंडी उडाली. परंतु, पाणंदीलगतच्या कुंपणामुळे त्यांना आणि अस्वलांनाही बाजूला जाता आले नाही. दरम्यान, बॅटरीच्या उजेडामुळे बिथरलेल्या अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ले नित्याचेच झाले..!अलिकडेच सडेगुडवळे येथील एका शेतकऱ्यावरही अस्वलाने हल्ला केला होता. भोगोली, पिळणी, झांबरे, उमगाव या परिसरात शेतकरी आणि पाळीव जनावरांवरील जंगली प्राण्यांचे हल्ले नित्याचेच झाले आहेत. सध्या शेतात खाण्यासाठी पिके नसल्यामुळे फणस खाण्यासाठी अस्वले गावाशेजारी आली होती. फणस खावून जंगलाकडे परतताना त्यांनी हा हल्ला केला. शेतमजूर कुटूंब..गावडे यांची केवळ दीडएकर शेती आहे. जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे ते केवळ भाताचेच पीक घेतात. इतरवेळी शेती कामासाठी ते मजुरीला जातात. किमान पोटापुरते भात मिळावे म्हणून जीवाची पर्वा न करता भातशेतीची रखवाली करताना त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर