दुकाने सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:16 IST2021-06-30T04:16:37+5:302021-06-30T04:16:37+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका व कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण क्षेत्रातील ४२ गावांतील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्या, या व्यावसायिकांच्या ...

दुकाने सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका व कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण क्षेत्रातील ४२ गावांतील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्या, या व्यावसायिकांच्या मागणीचा प्रस्ताव सोमवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवण्यात आला आहे. दुकाने सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आज बुधवारपर्यंतची मुदत दिली असून, शासनाकडे परवानगी प्रलंबित राहिल्यास दुकाने उद्या गुरुवारपासून सुरू केली जाणार आहेत.
कोल्हापूर महापालिका व प्राधिकरण क्षेत्रातील गावांमध्ये पॉझिटिव्ह रेट कमी असल्याने व ऑक्सिजन बेडची गरजही ४५ टक्क्यांच्यावर असल्याने व्यावसायिकांनी सरसकट दुकाने सुरू करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यावर मंगळवारी सायंकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची बैठक होऊन हा प्रस्ताव राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर तातडीने यावर कार्यवाही करण्यात आली. व्यावसायिकांनी प्रशासनाला दोन दिवसांचा वेळ दिल्याने आता विभागाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
---
कोल्हापूर शहर व प्राधिकरणअंतर्गत सद्य:स्थिती
२०११ च्या जनगणनेनुसार महापालिका क्षेत्राची लोकसंख्या : ५ लाख ४९ हजार २३६
१७ ते २४ जुलै दरम्यानचा पॉझिटिव्ह रेट : ७.७६ टक्के
२५ ते २७ जुलै या तीन दिवसांचा पॉझिटिव्ह रेट : १.९४
प्राधिकरणमधील ४२ गावांची लोकसंख्या : ३ लाक ७ हजार ५८२
महापालिका व प्राधिकरण क्षेत्राची एकूण लोकसंख्या : ८ लाख ५६ हजार ८१८
--