शहापूर खणीवरील फेरबदल स्थगितीचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे सादर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:39+5:302021-07-07T04:31:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहापूर गट नं. ४६२ व ४६३ या जागेवरील भागश: अॅग्रोकल्चरल अॅण्ड नो डेव्हलपमेंट व ...

शहापूर खणीवरील फेरबदल स्थगितीचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे सादर करावा
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहापूर गट नं. ४६२ व ४६३ या जागेवरील भागश: अॅग्रोकल्चरल अॅण्ड नो डेव्हलपमेंट व भागश: वॉटर बॉडीऐवजी एकत्रित औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र असा फेरबदलाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासाठी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यास भागातील नागरिकांचा विरोध होत असल्याने स्थगितीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा, अशा मागणीचे निवेदन नगरसेविका सरिता आवळे यांनी मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांना दिले.
निवेदनात, शहापूर हद्दीतील गट नं. ४६२ व ४६३ मधील सुमारे चार एकर क्षेत्र सीईटीपी संस्थेने खरेदीपूर्व करार केला असून, फेरबदल प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्याची मागणी सीईटीपीचे अध्यक्ष यांनी केली आहे. इचलकरंजी शहराची मूळ हद्दीचे सुधारीत मंजूर विकास योजना महाराष्ट्र शासनाचे नगरविकास विभागाकडील अधिसूचनेनुसार मंजूर करण्यात आली असून, ती अंमलात आलेली आहे. सदरची जागा नो डेव्हलपमेंट झोनमध्ये समाविष्ट असून, उर्वरित जागा भागश: वॉटर बॉडी विभागामध्ये समाविष्ट होते. त्याठिकाणी सीईटीपीकरीता बांधकाम अनुज्ञेय होणार नाही.