शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

वाहतूक कोंडी; कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचा प्रस्ताव - महाडिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:50 IST

कोल्हापूर : शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या मार्गावरील उड्डाणपूल ...

कोल्हापूर : शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या मार्गावरील उड्डाणपूल बांधण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. यासंबंधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, शहर वाहतूक आदी विभागांच्या समन्वयाने पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.आमदार महाडिक यांनी महापालिकेत प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासोबत विविध विषयांसंदर्भात बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.आमदार महाडिक म्हणाले, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शहरातील रस्ते करण्यासाठी नगरोत्थान योजनेतून आणखी निधी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या निधीतून शहरातील रस्ते चकाचक करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामे गतीने होतील.महापालिका मुख्य इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विविध निधी उपलब्ध केला जाईल. शेजारच्या गावातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचरा संकलनासाठी जागा नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करून नव्या जागेचा शोध घेतला जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडीAmal Mahadikअमल महाडिक