खासगी विमानसेवेबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
By Admin | Updated: January 3, 2016 00:25 IST2016-01-03T00:25:39+5:302016-01-03T00:25:39+5:30
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

खासगी विमानसेवेबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
कोल्हापूर : विमानतळ विस्तारीकरणाबाबत आपल्यासह जिल्हा प्रशासन गांभीर्याने विचार करत असून, या संदर्भात पंधरा दिवसांत मुंबईत बैठक घेतली जाईल. तसेच कोल्हापुरात खासगी विमानसेवा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्री म्हणाले, छोट्या गावांपर्यंत विमानसेवा पोहोचावी अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. त्यामुळे याकरिता खासगी विमानसेवेचाही विचार केला जात आहे. याच धर्तीवर कोल्हापुरात अशा पद्धतीने सेवा सुरू करण्यासाठी उद्योगपती संजय घोडावत यांच्या ग्रुपने तयारी दर्शविली आहे. याबाबतचा प्रस्तावही त्यांनी तयार करून मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. या प्रस्तावाचे सादरीकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घोडावत यांना बोलावले आहे. हा प्रस्तावच अंतिम होईल असे नाही, याशिवाय चांगला प्रस्ताव आल्यास त्याचाही विचार केला जाणार आहे. (प्रतिनिधी)