अभियंत्याकडे सापडली ३४.५० लाखांची संपत्ती

By Admin | Updated: January 21, 2015 23:53 IST2015-01-21T22:11:16+5:302015-01-21T23:53:06+5:30

कोल्हापुरातही एक सदनिका असून, त्याची किमत ५.५० लाख असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून देण्यात आली.

The property worth 34.50 lakh found by the engineer | अभियंत्याकडे सापडली ३४.५० लाखांची संपत्ती

अभियंत्याकडे सापडली ३४.५० लाखांची संपत्ती

सातारा : दोन हजारांची लाच घेताना जाळ्यात सापडलेल्या उपअभियंता श्रीकांत रामचंद्र चौगुले याच्याकडे ३४.५० लाखांची मालमत्ता आढळून आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा येथील कार्यालयातून देण्यात आली.
दरम्यान, श्रीकांत चौगुलेवर रात्री उशिरा कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक झाली. बुधवारी सातारा न्यायालयात हजर केले असता जामिनावर मुक्तता झाली. श्रीकांत चौगुले (सध्या रा. जिल्हा परिषद क्वार्टर सदनिका क्रमांक ५, जिल्हा परिषदेच्या पाठीमागे, सातारा. मूळ रा. गगणगिरी हौसिंग सोसायटी, प्लॉट नंबर १७/१, कदमवाडी, भोसलेवाडी, कोल्हापूर) हा कोरेगाव पंचायत समितीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागात उपअभियंता आहे. त्यांने तक्रारदाराकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअतंर्गत वैयक्तिक विहीर बांधकामाची पाहणी करून तसा अहवाल देण्यासाठी दोन हजारांची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. चौगुले याला मंगळवारी लाचलुचपतच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लाच घेताना जाळ्यात पकडले. दरम्यान, या घटनेनंतर चौगुले याचा पुण्यामध्ये एक फ्लॅट असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे एसीबीचे पथक येथे झडतीसाठी गेले होते. येथे काही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली नसली तरी त्याची किमत २९ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. चौगुले याची कोल्हापुरातही एक सदनिका असून, त्याची किमत ५.५० लाख असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: The property worth 34.50 lakh found by the engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.