कबनुरात वासुदेवाच्या भूमिकेतून प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:51+5:302021-01-13T05:01:51+5:30

प्रभाग क्रमांक १ मधील अपक्ष उमेदवार राधिका दत्ता शिंदे यांचा प्रचार दररोज सकाळी वासुदेवाच्या वेशभूषेमध्ये त्यांचे पती दत्ता शिंदे ...

Propaganda from the role of Vasudeva in Kabanura | कबनुरात वासुदेवाच्या भूमिकेतून प्रचार

कबनुरात वासुदेवाच्या भूमिकेतून प्रचार

प्रभाग क्रमांक १ मधील अपक्ष उमेदवार राधिका दत्ता शिंदे यांचा प्रचार दररोज सकाळी वासुदेवाच्या वेशभूषेमध्ये त्यांचे पती दत्ता शिंदे करत आहेत. मटण-दारू-पैसे वाटप करून सत्तेत आलेले सत्ताधारी हे कोणत्याही प्रकारचे काम करत नसून ते पाच वर्षे गाव लुटण्याचे काम करत आहेत. त्यामुळे काम करणाऱ्या, सामाजिक तळमळ असणाऱ्या अशा उमेदवाराला आपण बहुमताने निवडून द्यावे, असा प्रचार सुरू आहे. त्यांच्या प्रचाराच्यावेळी गल्ली-बोळात व भागातील लहान मुले कुतूहलाने याकडे पाहत आहेत. प्रचाराची अनोखी पद्धत पाहून बरेच नागरिकही वासुदेवाची कहाणी ऐकण्यासाठी घरातून बाहेर येऊन उभे राहत आहेत.

(फोटो ओळी) १२०१२०२१-आयसीएच-०१

१२०१२०२१-आयसीएच-०२ कबनूर (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दत्ता शिंदे हे वासुदेवाच्या वेशभूषेमध्ये प्रचार करताना दिसत आहेत.

Web Title: Propaganda from the role of Vasudeva in Kabanura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.