कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये नियमबाह्य पद्धतीने दिलेली पदोन्नतीबाबत अहवाल मागवल्यानंतर बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ५५ कर्मचाऱ्यांची पदोन्नती रद्द केली. सेवाज्येष्ठता डावलून संचालक मंडळाने पदोन्नती दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांसह काही संचालकांमध्ये अस्वस्थता होती. याविरोधात दोन संचालकांनी तक्रार केली होती.बाजार समितीचा कारभार गेल्या चार-पाच महिन्यांपासून चर्चेत राहिला आहे. समिती आवारातील कामांसह एकूणच कारभाराबाबत कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यात सभापतींनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या आठ-दहा दिवसांत काही निर्णय घेतले होते. जिल्हा उपनिबंधकांकडून सुरक्षा रक्षकांची १५ पदे कमी करून तेवढीच पदे कनिष्ठ लिपिकांच्या जागा वाढवून घेतल्या. त्या पंधरा जागांसह इतर ४२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली.बाजार समितीच्या नियमानुसार सेवाज्येष्ठता डावलून ही पदोन्नती दिल्याची तक्रार व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार वळंजू व कुमार आहुजा यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधकांनी बुधवारी समितीकडे तातडीने खुलासा मागितला.दरम्यान, उपसभापती राजाराम चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ५५ कर्मचाऱ्यांना दिलेली पदोन्नती रद्द करण्याचा ठराव करण्यात आला.
पगार वसुलीचे आव्हानकर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश अद्याप दिलेले नाहीत, तोपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पदोन्नतीनुसार पगारही जमा केले. आता पदोन्नतीच रद्द केल्याने दिलेल्या पगाराची वसुलीचे आव्हान समिती प्रशासनासमोर राहणार आहे.
सेवाज्येष्ठता डावलून कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्याबाबत समिती प्रशासनाकडे खुलासा मागितला आहे, त्यांनी पदोन्नतीचा आदेश रद्द केल्याचे समजते. - निलकंठ करे (जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर)
Web Summary : Kolhapur Market Committee revoked 55 employees' promotions after complaints of violating seniority rules. Two directors filed the initial complaint. The committee now faces the challenge of recovering overpaid salaries.
Web Summary : वरिष्ठता नियमों के उल्लंघन की शिकायत के बाद कोल्हापुर बाजार समिति ने 55 कर्मचारियों की पदोन्नति रद्द कर दी। अब समिति के सामने अधिक भुगतान किए गए वेतन की वसूली की चुनौती है।