पुरोगामी नेते, विचारवंतांना संरक्षण द्या : ब्लॅँक पँथर
By Admin | Updated: February 26, 2015 00:11 IST2015-02-25T23:51:50+5:302015-02-26T00:11:40+5:30
सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचाही खून झाला आहे. याचा अर्थ पूर्वीचे व सध्याचे सरकार पुरोगामी जनतेचे संरक्षण करू शकत नाही, असा होत आहे.

पुरोगामी नेते, विचारवंतांना संरक्षण द्या : ब्लॅँक पँथर
कोल्हापूर : राज्यात परिवर्तनवादी व पुरोगामी चळवळीतील नेते, विचारवंत, कामगार नेते व पत्रकार यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येमुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे संबंधितांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी बुधवारी ब्लॅक पॅँथर पक्षातर्फे जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
डॉ. दाभोलकर, अॅड. पानसरे व त्यांच्या पत्नी उमाताई यांच्यावर जीवघेणा हल्ला होऊन त्यांची हत्या केली. सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचाही खून झाला आहे. याचा अर्थ पूर्वीचे व सध्याचे सरकार पुरोगामी जनतेचे संरक्षण करू शकत नाही, असा होत आहे. प्रा. एन. डी. पाटील, बाबा आढाव, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे, खा. रामदास आठवले, खा. शेट्टी, डॉ. प्रकाश आंबेडकर, प्रा. कवाडे, राजेंद्र गवई, पुरुषोत्तम खेडेकर, शाहीर संभाजी भगत, मेधा पाटकर आदींना संरक्षण द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात सुभाष देसाई, नंदा भोगम, अमित पावले, दयानंद कांबळे, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)