कोरोनाबाबतच्या कामाची प्राध्यापकांना जबाबदारी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:24 IST2021-05-11T04:24:54+5:302021-05-11T04:24:54+5:30
कोरोनाच्या स्थितीत सर्व शासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग हा नागरिकांना वैद्यकीय सेवा-सुविधा देण्याचे काम करत आहे. या यंत्रणेमध्ये ...

कोरोनाबाबतच्या कामाची प्राध्यापकांना जबाबदारी द्यावी
कोरोनाच्या स्थितीत सर्व शासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग हा नागरिकांना वैद्यकीय सेवा-सुविधा देण्याचे काम करत आहे. या यंत्रणेमध्ये प्राथमिक शाळांमधील शिक्षक हे मदतनीस म्हणून काम करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या कामामध्ये माध्यमिक शिक्षकांनादेखील सहभागी करून घेतले आहे. काही शिक्षक हे अखंडितपणे १८५ दिवस काम करत आहेत. प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांबरोबर कोल्हापूर शहरातील कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांनादेखील या कोरोनाबाबतच्या कामाची जबाबदारी द्यावी. सध्या महाविद्यालये बंद असल्याने ते शक्य आहे. कोरोनाबाबतची कामे देताना प्राथमिक, माध्यमिक शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासाठी रोटेशन पद्धतीचा वापर करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती या समितीचे निमंत्रक अशोक पोवार, रमेश मोरे यांनी दिली.