शिवाजी मुस्लिम ब्रिगेडची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:42 IST2019-02-20T00:42:04+5:302019-02-20T00:42:09+5:30

कोल्हापूर : ताशाच्या ठेक्यावर सुरूअसलेले कर्बला मेल नृत्य, लाठीकाठी, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके आणि ‘जय भवानी...जय शिवाजी’च्या जयघोषात छत्रपती शिवाजी ...

The procession of Shivaji Muslim Brigade | शिवाजी मुस्लिम ब्रिगेडची मिरवणूक

शिवाजी मुस्लिम ब्रिगेडची मिरवणूक

कोल्हापूर : ताशाच्या ठेक्यावर सुरूअसलेले कर्बला मेल नृत्य, लाठीकाठी, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके आणि ‘जय भवानी...जय शिवाजी’च्या जयघोषात छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने शिवजयंतीनिमित्त मंगळवारी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
हुतात्मा पार्क येथे आमदार सतेज पाटील, प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते पालखीतील शिवप्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. याचे ब्रिगेडचे अध्यक्ष फिरोजखान उस्ताद यांनी आयोजन केले होते. यावेळी गणी आजरेकर, कादर मलबारी, किशोर घाटगे, अजित सासने, वसंतराव मुळीक, स्वप्निल पार्टे, महेश जाधव, जयकुमार शिंदे, आदी सहभागी झाले होते.
कर्बला मेल नृत्य लक्षवेधी
हलगी-ताशाच्या वाद्यावर यळगुड येथील कर्बला मेल नृत्याने साऱ्यांचे लक्ष वेधले. मुस्लिम समाजातील युवक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीच्या अग्रभागी हे कर्बला मेल नृत्य करत होते. नृत्यात काठीवरील उडणारा तिरंगा झुपकेदार गोंडा हेच या नृत्यातील आकर्षण होते.

Web Title: The procession of Shivaji Muslim Brigade