बसवेश्वरांच्या जयघोषात मिरवणूक

By Admin | Updated: May 10, 2016 02:33 IST2016-05-10T01:41:19+5:302016-05-10T02:33:51+5:30

शिव-बसव जयंती : वाद्यांचा गजरासह ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी

Procession in the auspices of Basaveshwar | बसवेश्वरांच्या जयघोषात मिरवणूक

बसवेश्वरांच्या जयघोषात मिरवणूक



कोल्हापूर : ‘महात्मा बसवेश्वर महाराज की जय....’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’ असा अखंड जयघोष... त्याच्या जोडीला पारंपरिक वाद्यांचा गजर... ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने झालेले स्वागत... अशा उत्साही वातावरणात सोमवारी सायंकाळी महात्मा बसवेश्वर यांची पालखी मिरवणुकीची शोभायात्रा शहरातून निघाली. त्यामध्ये लिंगायत समाजबांधवांचा सहभाग लक्षणीय होता.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त ‘शिव-बसव जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत सोमवारी पालखी मिरवणूक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास दसरा चौक येथील चित्रदुर्ग मठ येथे या मिरवणुकीचे उद्घाटन चित्रदुर्ग मठाचे प. प. श्री. बसव महंत महास्वामीजी, ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक शेटे, तात्या कापसे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
महात्मा बसवेश्वरांची मूर्ती पालखीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापाठोपाठ असलेल्या वाहनावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा ठेवली होती. त्याच्या मागे ‘पाणी वाचवा...’, ‘झाडे लावा...’, असे प्रबोधनपर फलक लावलेल्या रिक्षा होत्या. अशा पद्धतीने प्रबोधनाचा जागर करत, ‘महात्मा बसवेश्वर महाराज की जय...’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’ अशा जयघोषात आणि पारंपरिक बँडचा समधुर निनाद अशा मंगलमय वातावरणात शहरातील दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, महापालिका, शनिवार पेठ-गवळी गल्ली, तेली गल्ली मार्गावरून मिरवणूक निघाली. ठिकठिकाणी
या मिरवणुकीचे फटाक्यांच्या आतषबाजीत व फुले-रांगोळ्यांनी स्वागत करण्यात आले. रात्री नऊच्या सुुमारास चित्रदुर्ग मठ येथे ही मिरवणूक विसर्जित झाली. यामध्ये लिंगायत समाजबांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)


युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त सोमवारी शहरातून लिंगायत समाजबांधवांतर्फे बसवेश्वरांची भव्य पालखी मिरवणूक शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये चित्रदुर्ग मठाचे प. पू. श्री. बसव महंत महास्वामीजी, विवेक शेटे, तात्या कापसे, राजू वाली, आदी सहभागी झाले होते.

Web Title: Procession in the auspices of Basaveshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.