राज्यातील स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठांच्या अडचणींचा अभ्यास होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:41 IST2021-05-05T04:41:05+5:302021-05-05T04:41:05+5:30
या स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठांना शैक्षणिक कामकाज करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यांचे निराकारण करण्याची मागणी या विद्यापीठांकडून शासनाकडे झाली होती. ...

राज्यातील स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठांच्या अडचणींचा अभ्यास होणार
या स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठांना शैक्षणिक कामकाज करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यांचे निराकारण करण्याची मागणी या विद्यापीठांकडून शासनाकडे झाली होती. त्याची दखल घेऊन शासनाने नऊसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दि. १२ एप्रिल रोजी काढला आहे. या समितीमध्ये उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने (अध्यक्ष), तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट डॉ. मंगेश कराड, संदीप विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. संदीप एन. झा, सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सायली गानकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वरिष्ठ कायदा अधिकारी डॉ. परवीन सय्यद (सदस्य), उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रशासनाधिकारी (सदस्य सचिव) यांचा समावेश आहे. या समितीने त्यांचा अंतरिम अहवाल तीन महिन्यांत शासनाला सादर करावयाचा आहे.
चौकट
समिती हे करणार
सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठांच्या अधिनियमातील सर्व कलमांचा अभ्यास करणार. अधिनियमांतील कोणत्या कलमांतील तरतुदींचे पालन करताना निर्माण होतात, त्या अडचणींची माहिती घेणार. या विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या अडचणींचा अभ्यास करणार. या अडचणी कशा दूर करता येतील, याबाबत उपाययोजना सुचविण्याचे काम समिती करणार आहे.
प्रतिक्रिया
समिती स्थापन केल्याचा आदेश निघाला आणि त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदी लागू झाली. त्यामुळे समितीच्या कामाची सुरुवात करता आली नाही. पुढील आठवड्यात समितीची बैठक घेऊन काम सुरू करण्यात येईल.
- डॉ. धनराज माने