पोलीस दलातील समस्या, बेकायदेशीर प्रकार कळवा नव्या नंबरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:10+5:302021-07-18T04:18:10+5:30
कोल्हापूर : पोलीस दलातील कामामध्ये येणाऱ्या अडचणी मांडण्यासाठी आणि बेकायदेशीर प्रकाराबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ...

पोलीस दलातील समस्या, बेकायदेशीर प्रकार कळवा नव्या नंबरवर
कोल्हापूर : पोलीस दलातील कामामध्ये येणाऱ्या अडचणी मांडण्यासाठी आणि बेकायदेशीर प्रकाराबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नवा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांनी ८४११८४९९२२ या मोबाईल क्रमांकावर आपले प्रश्न, समस्या अगर गोपनीय माहिती कळवण्याचे आवाहन केले आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांना पोलीस सेवा उपलब्ध व्हावी, त्यांच्या विभागामार्फत काही अडचणी, समस्या असतील तर त्यांना सहजपणे मांडता याव्यात. पोलिसांची तातडीने मदत वेळेत मिळावी, एखाद्या भागात बेकायदेशीर बाबी सुरू असतील तर त्या पोलिसांच्या निर्देशास आणून देता याव्यात. यासाठी अधीक्षक बलकवडे यांनी पुढाकार घेत ही नवा मोबाईल क्रमांकाची सुविधा सुरू केला आहे. हा क्रमांक खुद्द पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारित राहणार आहे. बेकायदेशीर बाबींची माहिती कळवणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून संबधितांवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. जनहितार्थ हा नवीन नंबर सुरू केला असून पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारीत हा नंबर राहणार आहे.
सकाळी ७ ते रात्री दहापर्यंत...
सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत हा नंबर उपलब्ध राहणार आहे. ८४११८४९९२२ या मोबाईल क्रमांकाचा नागरिकांनी वापर करून आपल्या अडचणी व समस्या मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे केले आहे.